पुढारी ऑनलाइन डेस्क : भटक्या कुत्र्यांचा धोका आणि पाळीव प्राण्यांचे हल्ले याबाबत नोएडा प्राधिकरणाने शनिवारी बैठक घेतली. या बैठकीमध्ये प्राधिकरणाने एक आदेश जारी केला आहे. 1 मार्च 2023 पासून, पाळीव कुत्रा किंवा मांजरीमुळे कोणतीही अनुचित घटना घडल्यास, मालकाला 10,000 रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला जाईल आणि मालकाकडून त्यांचेवर उपचार करण्यात येतील.
ॲनिमल वेल्फेअर बोर्डाच्या नियमांनुसार, नोएडा प्राधिकरणाने धोरणे निश्चित करणेसाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, अंतर्गत पाळीव कुत्रे आणि मांजरींची पाळीव प्राणी नोंदणी ॲपद्वारे मार्च 2023 पर्यंत करणे अनिवार्य आहे. जे नागरीक आपल्या प्राण्याची नोंदणी करणार नाहीत त्यांना दंड आकारण्यात येईल.
तसेच पाळीव कुत्र्यांची नसबंदी आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण अनिवार्य केले आहे. याचे उल्लंघन केल्यास 01 मार्च 2023 पासून प्रति महिना 2,000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी पाळीव कुत्रा घाण केली तर ते स्वच्छ करण्याचीही जबाबदारी मालकाचीच असेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा