Twitter : ट्विटर ब्लू टिक सबस्क्रिप्शन पुन्हा सुरू होणार? एलॉन मस्क म्‍हणाले….

एलॉन मस्क
एलॉन मस्क
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : एलॉन मस्क यांनी ट्विटर हाती घेतल्यापासून नवीन बदल होत आहेत. पूर्वी कंपनीने नवीन ब्लू टिक सबस्क्रिप्शनसाठी सशुल्क सेवा जाहीर केली होती. सध्या ट्विटरवर iOS वापरकर्त्यांसाठी ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवेला स्थगिती देण्यात आली आहे. याचे कारण देताना मस्क यांनी म्हटले होते की, बनावट खाती मोठ्या प्रमाणात असल्याने या सेवेला स्थगिती देण्यात आली आहे. मात्र ही सेवा पुन्हा लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत ट्विटरकडून देण्यात आले आहेत.

रविवारी (दि. 13) सकाळी एका ट्विटर वापरकर्त्याच्या प्रश्नाच्या उत्तरावर एलॉन मस्क म्हणाले की, ब्लू टिक सबस्क्रिप्शन पुढील आठवड्यापर्यंत सुरू केले जाऊ शकते. ही सेवा थांबवल्यानंतर वापरकर्त्यांना मासिक शुल्क 8 डॉलर आकारले गेले, असे एलॉन मस्क म्हणाले.

सध्या ट्विटरवर ब्लू टिक सेवा उपलब्ध नाही. ट्विटरद्वारे यूएस, कॅनडा सारख्या देशांसाठी ब्लू टिक व्हेरिफिकेशन सेवा सुरू करण्यात आली होती, जी iOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होती. या सेवेचा वापर करून, वापरकर्ते त्यांच्या प्रोफाईलवर मासिक शुल्‍क 8 डॉलर भरून ब्लू टिक मिळवू शकत होते. परंतु आता हे फीचर iOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही.

जेव्हा iOS वापरकर्ते सशुल्क ब्लू टिक सेवेसाठी अर्ज करत आहेत. त्‍यानंतर तेव्हा एक मेसेज येत आहे की सशुल्क सेवा घेतल्याबद्दल धन्यवाद, असे लवकरच उपलब्ध होणार आहे.

भारतात ब्लू टिक सेवेची किंमत

ट्विटरने 9 नोव्हेंबर रोजी यूएस, यूके आणि इतर काही देशांमधील वापरकर्त्यांसाठी ट्विटर ब्लू लाँच केले. यूएसमध्ये या सेवेची किंमत सुमारे 8 डॉलर इतकी आहे. तर भारतात त्याची किंमत ७१९ रुपये असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news