US Midterm Poll : डोनाल्‍ड ट्रम्‍प यांना झटका, अमेरिकेत 'डेमोक्रेटिक'ची सत्ता अबाधित | पुढारी

US Midterm Poll : डोनाल्‍ड ट्रम्‍प यांना झटका, अमेरिकेत 'डेमोक्रेटिक'ची सत्ता अबाधित

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेत झालेल्या मध्‍यावधी निवडणुकीत दोन जागांवर रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाल्‍याने अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. ( US Midterm Poll )  आणखी एका जागेवरील निकाल बाकी असला तरी येथे डेमोक्रेटिक पक्षाचा विजय निश्‍चित मानला जात आहे. या निकालामुळे अमेरिकेतील सिनेटवर पुढील दोन वर्षांसाठी डेमोक्रेकिट पक्षाची सत्ता अबाधित राहणार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

अमेरिकेतील मध्‍यावधी निवडणुकीत रिपब्‍लिकन पक्षाला ॲरिजोनापाठोपाठ नेवाडा मतदारसंघात पराभवाला सामोर जावे लागले. या दोन्‍ही मतदारसंघात आपला विजय होईल, असा दावा पक्षाकडून करण्‍यात येत होता. शुक्रवारी ॲरिजोना येथील निकाल समोर आले. रिपब्‍लिकन पक्षाचे उमेदवार ब्‍लेक मास्‍टर्स यांना माजी अंतराळ यात्री आणि डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार मार्क केली यांनी पराभूत केले.

शनिवारी नेवाडा शहरात राष्‍ट्राध्‍यक्ष ज्‍यो बायडेन यांच्‍या पक्षाचे उमेदवारी कॅथरीन कोर्टज
मस्‍टो यांचा विजय झाला. ट्रम्‍प यांच्‍या रिपब्‍लिकन पार्टीच्‍या उमेदवार ॲडम लॅक्‍साल्‍ट यांनी मस्‍टो यांना कडवी टक्‍कर दिली.

US Midterm Poll : ‘डेमोक्रेटिक’ला बहुमत

अमेरिकेच्‍या १०० सदस्‍यी सिनेटमध्‍ये आता डेमोक्रेटिक पक्षाचे ५० तर रिपब्‍लिकन पार्टीचे ४९ सदस्‍य आहेत. अद्याप जॉर्जिया येथील निकाल बाकी असून, येथे ड्रेमोक्रेटिक पक्षाचा विजय निश्‍चित मानला जात आहे. त्‍यामुळे आता सिनेटमध्‍ये डेमोक्रेटीक पक्षाचे संख्‍याबळ ५१ होईल, असा विश्वास डेमोक्रेटिक पक्षाकडून व्यक्त केला जात आहे. या बहुमतामुळे अमेरिकेतील सिनेटमध्‍ये पुढील दोन वर्ष डेमोक्रॅटिक पक्षाचे सत्ता अबाधित राहणार आहे.

अमेरिकेमध्‍ये मध्‍यावधी निवडणुकांसाठी ८नोव्‍हेंबर रोजी मतदान झाले होते. अमेरिकेन संसदेची हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेटही दोन प्रमुख अंगे आहेत. यामध्ये वरिष्ठ सभागृह असणार्‍या सिनेटला अधिक अधिकार असताता. या सभागृहावे अध्‍यक्ष हे देशारचे उपराष्‍ट्राध्‍यक्ष असतात. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष हे सिनेटचे अध्यक्ष असतात. अमेरिकेत कोणताही कायदा बनवण्यासाठी आणि तो लागू करण्यासाठी सिनेटची परवानगी अपरिहार्य असते.

 

Back to top button