नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या शशी थरूर यांचे महत्त्व कमी करण्याच्या मोहिमेस सुरुवात झाली आहे, अशी टीका भाजपचे आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी केली.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांनी शशी थरूर यांचा पराभव केला होता. त्यानंतर खर्गे यांनी काँग्रेस कार्यसमिती विसर्जित करून ४७ नेत्यांची संचलन समिती तयार केली होती. या समितीत थरूर यांना स्थान देण्यात आले नव्हते. हा संदर्भ देत भाजपचे मालवीय यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीकेचा आसूड ओढला आहे. काँग्रेसमधून शशी थरूर यांचे महत्त्व कमी करण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. गांधी हे कोणालाही सोडणार नाहीत. पुढचा नंबर कदाचित राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा असेल, असा टोला मालवीय यांनी गुरुवार सोशल मीडियाच्या माध्यमातून लगावला आहे.
हेही वाचा :