पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियात राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना आज (दि.१७ मार्च) युक्रेनने माेठा ड्राेन हल्ला केल्याचे वृत्त आहे. मॉस्को शहरात चार तर अन्यत्र 35 युक्रेनियन ड्रोन रात्रभर पाडण्यात आले आहेत, अशी माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने दिल्याचे वृत्त रशियातील TASS वृत्तसंस्थाने दिले आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालले नाही,असे मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी स्पष्ट केले आहे. दरमान्य, रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी पहिल्यांदाच सलग तीन दिवस मतदान होत आहे.
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनचे दोन ड्रोन मॉस्कोच्या दक्षिणेकडील कलुगा प्रदेश आणि मॉस्कोच्या ईशान्येस येरोस्लाव्हल प्रदेशामध्ये पाडण्यात आले. यारोस्लाव्हल प्रदेशावरील हल्ले हे युक्रेनने आतापर्यंत केलेले सर्वात दूरवरचे हल्ले होते. हे क्षेत्र युक्रेनियन सीमेपासून सुमारे 800 किलोमीटर (500 मैल) अंतरावर आहे. मॉस्को शहरात चार तर अन्यत्र 35 युक्रेनियन ड्रोन रात्रभर पाडण्यात आले आहेत. रशियातील सीमावर्ती शहर बेल्गोरोडमध्ये युक्रेनियन गोळीबारात दोन लोक ठार आणि तीन जखमी झाल्याचेही संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
रशियन सैन्याने असा दावा केला आहे की, त्यांनी शनिवारी युक्रेनियन विध्वंस आणि टोही गटांचा सीमापार घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला.शनिवारी सोशल मीडियावर 25 रशियन सैनिकांना पकडल्याचा आरोप करत एक व्हिडिओ जारी केला. दाव्याची स्वतंत्रपणे पडताळणी करता आली नाही. युद्ध सुरू झाल्यापासून या प्रदेशात सीमापार हल्ले तुरळकपणे झाले आहेत.
रशियनातील ड्यूमाच्या उच्च सभागृहाने सुरुवातीला 17 मार्च 2024 ही राष्ट्रपती निवडणुकीची तारीख म्हणून घोषित केली. मात्र यानंतर रशियन केंद्रीय निवडणूक आयोगाने (CEC) 15 ते 17 मार्च दरम्यान राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मतदान होईल, असे स्पष्ट केले होते. रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी पहिल्यांदाच तीन दिवस मतदान होत आहे. या निवडणुकीत पुतीन यांच्याविरोधात व्लादिस्लाव दाव्हान्कोव्ह, लिओनिड स्लुत्स्की आणि निकोले खारिटोनोव्ह उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
२००० मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत व्लादिमीर पुतिन हे पहिल्यांदा अध्यक्ष झाले. यानंतर २००४, २०१२ आणि २०१८ मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकांमध्ये पुतिन यांनी सत्ता अबाधित ठेवली. आताही पुतिन हेच पुढील सहा वर्षांसाठी रशियाची सत्ता आपल्या हाती ठेवण्यात यशस्वी होतील, असे मानले जात आहे.
हेही वाचा :