Russia Military Plane Crash: रशियाचे लष्करी वाहतूक विमान कोसळले; १५ ठार | पुढारी

Russia Military Plane Crash: रशियाचे लष्करी वाहतूक विमान कोसळले; १५ ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क: रशियामध्ये लष्करी वाहतूक विमान उड्डाण घेत असताना कोसळले. या विमान दुर्घटनेत १५ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अचानक इंजिनमध्ये आग लागली आणि ही विमान दुर्घटना घडली. या महिन्यातील रशियामधील ही दुसरी विमान दुर्घटना आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. (Russia Military Plane Crash)

मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने मंगळवारी (दि.१२) सांगितले की, त्यांचे एक मालवाहू विमान क्रॅश झाले आहे. त्यात १५ जण होते. या अपघातात विमानातील सर्व लोकांचा मृत्यू झाला आहे. इंजिनला आग लागल्याचे कारण सांगितले जात आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानेही या अपघाताला दुजोरा दिला आहे. रशियातील इव्हानोवो भागात हे विमान कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. (Russia Military Plane Crash)

रशियन सोशल मीडियावर या लष्करी विमान दुर्घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मात्र, संरक्षण मंत्रालयाने कोणत्याही व्हिडिओला दुजोरा दिलेला नाही. याआधी जानेवारी महिन्यात रशियन विमान कोसळले होते. यामध्ये ७४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी बहुतेक युक्रेनमधील कैदी होते, असे रशियामधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे. (Russia Military Plane Crash)

हे ही वाचा:

Back to top button