संतापजनक; सामूहिक अत्याचारानंतर हत्या, हैवानांचा महिलेच्या मृतदेहावरही बलात्कार

 सामूहिक बलात्‍कार
सामूहिक बलात्‍कार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील खापा पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी कापूस वेचणाऱ्या एका महिलेचा मृतदेह शेतात बेवारस अवस्थेत आढळून आला होता. मृतदेहाच्या अवस्थेवरूनच तिचा खून झाल्याचे स्पष्ट होत असल्याने खापा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आता धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

या प्रकरणात संशयित तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्या महिलेवर या तिघांनी बळजबरीने सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर तिची हत्या केली. डोक्यात सैतान संचारल्याने ऐवढ्यावरच ते तिघे थांबले नाहीत तर हत्या केल्यानंतरही या महिलेवर त्यांनी बलात्कार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ही घटना उघडकीस आल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.

नागपूर जिल्ह्यातील खापा पोलिस ठाण्यांतर्गत सुरेवानी गावात १२ जानेवारीला मृत महिला एकटी शेतात कापूस वेचत होती. त्यावेळी तिच्यावर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तिघांना ताब्यात घेतले होते.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदरील महिला शेतात कापूस वेचण्यासाठी गेली होती, यावेळी ती शेतात एकटी असल्याचे पाहून तिघेजण तिच्याजवळ आले. आजूबाजूला कुणी नसल्याचे पाहून या तिघांनी तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. महिलेने यास विरोध करताच तिघांनी महिलेला बेदम मारहाण करत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. यावरच न थांबता त्या तिघांनी कुऱ्हाडीने वार करत तिची  हत्या केली आणि नंतर पुन्हा तिच्या मृतदेहावर देखील सामूहिक अत्याचार केला.

सदरील महिलेच्या पतीला वाघाच्या शिकारीच्या गुन्ह्यात अटक झाली असून तो सध्या कारागृहात आहे. यामुळे ती एकटीच राहत असल्यामुळे आरोपी आबू ऊर्फ दिनेश उईके, नंदकिशोर उईके आणि सिद्धार्थ पाटील यांची तिच्यावर वाईट नजर होती. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी संशयित तिघांना अटक केली असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नागपूर पोलिस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news