पॅरिस (फ्रान्स) पुढारी ऑनालाईन : रोज नवनवे कोरोनाचे व्हेरियंट आढळून येत आहेत. डेल्डा, त्यानंतर ओमायक्राॅन आणि त्यातून खतरनाक असणारा एक व्हेरियंट समोर आलेला आहे. हा ओमायक्राॅनपेक्षा जास्त संक्रमण होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरियंट म्यूटेड असून त्याचं नाव आयएचयू (IHU Variant) असं ठेवण्यात आलं आहे.
कोरोनाचा B.1.640.2 हा व्हेरियंट IHU मेडिटेरेन्स इन्फेक्शनच्या तज्ज्ञांनी शोधून काढलेलं आहे. संशोधकांनी सांगितलं आहे की, हा व्हेरियंटमध्ये ४६ म्युटेशन्स आहे, जे ओमायक्राॅनपेक्षाही मोठ्या प्रमाणात आहे. IHU Variant ची लागण झालेले १२ रुग्ण मार्सेल्लेस सापडलेले आहेत. यातील काही लोक आफ्रिकेत कॅमेरुनला गेलेले होते, अशीही माहिती समोर आलेली आहे.
असं असलं तरी जागतिक आरोग्य संघटनेनं IHU व्हेरियंटसंदर्भात कोणतीत घोषणा केलेली नाही. कारण, हा व्हेरियंट फ्रान्स वगळता इतर कोणत्याही देशांमध्ये सापडलेला नाही. मात्र, ओमायक्राॅनपेक्षा या व्हेरियंटचा प्रसाराचा वेग जास्त असल्यामुळे संक्रमण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता संशोधकांमधून व्यक्त केली जात आहे.
जगभरात पुन्हा एकदा कोरोनाची मोठी लाट आलेली आहे. लाखोंच्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. जाॅन हाॅपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत जगभरात २९२ दशलक्ष लोक कोरोनाबाधित आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत ५४ लाख ४० हजार लोकांचा मृत्यू झालेला आहे. पण, ९.२० अब्जहून जास्त लोकांनी कोरोनाची लस घेतलेली आहे.