Rekha Love Salman : "रेखा अमिताभच्या प्रेमात, तर सलमान रेखाच्या प्रेमात; म्हणून तर..." | पुढारी

Rekha Love Salman : "रेखा अमिताभच्या प्रेमात, तर सलमान रेखाच्या प्रेमात; म्हणून तर..."

पुढारी ऑनलाईन डेस्क

मनोरंजनाच्या दुनियेत सलमान खानची प्रेम प्रकरणं इतकी गाजती आहेत की, त्याच्यासारखी क्वचितच इतरांची प्रेम प्रकरणं गाजली असतील. आता पुन्हा एकदा तो प्रेम प्रकरणावरून चर्चेत आलेला आहे. पन्नाशी गाठलेला सलमान अजूनही अविवाहीत आहे, त्यामुळे कदाचित सलमानच्या पूर्वीच्या, आताच्या आणि भविष्याच्या प्रेमाची चर्चा रंगत असते. (Rekha Love Salman)

तर, सलमान खान अनेक अभिनेत्री आणि माॅडलेच्या प्रेमात पडला आहे. त्यांच्यासाठी तो वाट्टेल ते करतो, हेदेखील बऱ्याचदा प्रेक्षकांसमोर आलेलं आहे. या अभिनेत्रींच्या यादीत आता ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा हिच्या प्रेमात खूप होता. रेखा आणि अमिताभ बच्चनचं प्रेम प्रकरण हेदेखील चांगला चर्चेचा विषय होता.

पण, आता अतिसुंदर दिसणाऱ्या रेखाच्या प्रेमात सलमान खाननं पडावं, हे मात्र सलमानच्या आणि रेखाच्या चाहत्यांचा आश्चर्याला धक्का बसणारं आहे. हे म्हणजे असं झालं की, रेखा अमिताभच्या प्रेमात आणि सलमान रेखाच्या प्रेमात… इतकंच नाही रेखावर सलमान इतका जीव जडला होता की, तो सायकलीवरून रेखाचा पाठलाग करायचा, असं आम्ही नाही तर खुद्द रेखाने सांगितलं आहे.

रेखा बिग बाॅसच्या ८ व्या सीजनमध्ये आली होती. तेव्हा तिने हा खुलासा केलेला आहे. बीग बाॅसच्या स्टेजवर आल्यानंतर सलमान खानच्या खोडकर वृत्तीचा किस्सा रेखाने सांगितला. रेखा म्हणाली की, “जेव्हा सलमान ७ वर्षांचा होता तेव्हा तो मला फाॅलो करायचा. मी सकाळी उठून चालायला जायचे. मी पुढे चालायचे आणि तो माझ्या मागे मागे चालायचा. त्यावेळी तो माझ्या चक्क प्रेमात पडला होता.” (Rekha Love Salman)

इतकंच नाही, तर रेखाने पुढे असं सांगितलं की, “घरी गेल्यानंतर सलमान खानने घरातील लोकांशी सांगितलं की, मी मोठा झालो ना… तर या मुलीशी मी लग्न करेन.” यावर सलमान खान लाजला आणि म्हणाला की, “कदाचित यामुळेच आतापर्यंत माझं लग्न झालेलं नाही.” त्यावर लगेच प्रतिक्रिया देताना रेखा म्हणाली की, “नाही, नाही. म्हणूनच मी लग्न केलं नाही.”

Back to top button