जयपूर : वृत्तसंस्था : पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदर नेहमीच चर्चेत असते. आता ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. एका विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. याबाबतच्या उत्तराची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
खरे तर बारावी परीक्षेच्या राज्यशास्त्र विषयाच्या एका प्रश्नपत्रिकेत भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणती सीमा आहे आणि त्याची लांबी किती आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर एका विद्याथ्यनि भारत- पाकिस्तानमधील सीमेचे नाव सीमा हैदर असून, त्याची लांबी पाच फूट सहा इंच आहे. विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेतील या उत्तराने सर्वच जण अवाक् झाले आहेत. ही उत्तरपत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून, त्यावर नेटकरी गमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली उत्तरपत्रिका राजस्थानच्या धौलपूर जिल्हातील बसेडी येथील सरकारी उच्च माध्यमिक हायस्कूलमधील (बागथर) आहे. मात्र, याबाबत काहीच स्पष्ट झालेले नाही आणि हायस्कूलनेही असे काहीच घडले नसल्याचे सांगितले.
हेही वाचा :