औरंगाबाद : सिल्लोड येथे माय- लेकीची गळफास घेऊन आत्महत्या

file photo
file photo
Published on
Updated on

सिल्लोड; पुढारी वृत्तसेवा : माय- लेकीने साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.२०) रोजी सकाळी तालुक्यातील पळशी येथे उघडीस आली. माय- लेकीच्या या सामूहिक आत्महत्येने एकच खळबळ उडाली असून आत्यमहत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

सुनिता भारत साबळे (वय ४७, रा. पळशी) आणि जागृती अनिल दांगोडे ( वय २७, रा. चिकलठाणा, औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या माय- लेकीचे नाव आहे.

याबाबत घटनेची माहिती अशी की, सुनिता साबळे व मुलगी जागृती दांगोडे काल रात्री नेहमीप्रमाणे झोपल्या होत्या. शुक्रवारी सकाळपासून त्या घराबाहेर दिसल्या नाहीत. यामुळे शेजारील महिलेने घराचे दार उलघडून आत पाहिले असता दोघींनी गळफास घेतल्याचे निदर्शानास आले. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्याने गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

यानंतर घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, संदीप कोथलकर यांनी घटनास्थळी घाव घेत पंचनामा केला. आणि दोघीचे मृतदेह सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनास पाठवले आहेत. माय- लेकीच्या सामूहिक आत्महत्येने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news