औरंगाबाद : ‘जय श्रीराम’ म्हणत खोटा व्हिडिओ बनविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा | पुढारी

औरंगाबाद : 'जय श्रीराम' म्हणत खोटा व्हिडिओ बनविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : ‘जय श्रीराम’ म्हणत, १५ जणांनी तलवारीने हल्ला केल्याची खोटी घटना सांगत एक व्हिडिओ बनविला. तोच व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात धार्मिक वातावरण संवेदनशील असल्याने, औरंगाबाद शहरातील या प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. या घटनेत इम्रान खान रज्जाक खान (वय-३७ वर्ष, धंदा चालक, रा. आलमगीर कॉलनी, रशिदपुरा, औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध पोलिस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले, आरोपी इम्रान खान याने जयस्वाल हॉल, शरद टी- प्यासा वाईन शॉपजवळ २८ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता “मुझे जय श्री राम बोलके तलवार से पंधरा जनोने मारे. ओ सब, सिडको बस स्टँडसे से मेरे पिछे थे. उनमें से एक का नाम राहुल है. वो आंबेडकर नगर का है” अशी खोटी घटना सांगत त्याचा व्हिडीओ बनविला. तो व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रसारित केला. बेकायदेशीर कृत्य करुन सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होईल तसेच, दोन समाजांमध्ये द्वेषभाव निर्माण करणारी विधाने केली. म्हणुन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उप. नि. शिंदे हे करत आहेत.

हेही वाचलत का ?

 

 

 

Back to top button