‘ईडी’ची मोठी कारवाई; सत्येंद्र जैन यांच्या निवासस्‍थानासह अन्‍य मालमत्तेवर छापे

सत्येंद्र जैन
सत्येंद्र जैन
Published on
Updated on

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा: दिल्लीचे आरोग्य मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांच्या अडचणी आणखी वाढतच आहेत. ईडी (प्रवर्तन निदेशालय) सोमवारी (दि.६) रोजी पहाटेच मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरावर छापा टाकण्‍यात आला. केंद्रीय तपास यंत्रणा पथकाने जैन यांच्या निवासस्थान आणि इतर अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीने कोलकाता येथील एका कंपनीशी संबंधित हवाला व्यवहारांप्रकरणी ९ जूनपर्यंत ईडीच्या ताब्यात असलेल्या सत्येंद्र जैन यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. जैन यांच्याशी संबंधित दक्षिण पूर्व दिल्लीतील सुप्रसिद्ध राम प्रकाश ज्वेलर्सच्या ठिकाणावर छापे टाकण्यात आले. सध्या दोन्ही ठिकाणी पुढील तपास कार्य सुरू आहे.

याआधी ईडीने सत्येंद्र जैन यांना ३० मे रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या चौकशीदरम्यान त्याच्या वकिलाला उपस्थित राहण्याची परवानगी देण्याच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली होती. या निर्देशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्तींनी ३ जून रोजी आपला अहवाल राखून ठेवला होता. याचदरम्यान ईडीने त्याच्या घरावर छापा टाकला.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news