टोमॅटो खात आहेत भाव ! श्रीरामपूर बाजार समितीत 55 रुपये किलो | पुढारी

टोमॅटो खात आहेत भाव ! श्रीरामपूर बाजार समितीत 55 रुपये किलो

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो भाव खात असून, शनिवारी प्रति किलो 55 रुपयांपर्यंत दर पोहोचले होते. टोमॅटोची 22 क्विंटल आवक झाली. कमीत कमी 45 रु. किलो, जास्तीत जास्त 55 रु. किलो व सरासरी 50 रु. किलो या दराने निघाले आहेत. टोमॅटोचे बाजार भाव स्थिर आहेत.

शिवराज्याभिषेक दिन विशेष : स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाच्या बांधणीला किती खर्च आला?

बटाटा 197 क्विंटल आवक झाली. कमीत कमी 15 रु. किलो, जास्तीत जास्त 20 रु. किलो, सरासरी 17.50 रु. किलो असे दर निघाले. टरबूज 17 क्विंटल आवक झाली. कमीत-कमी 6 रु. किलो, जास्तीत-जास्त 8 रु. किलो, सरासरी 7 रुपये किलो दर निघाले. आंबा 29 क्विंटल आवक झाली. कमीत-कमी 50 रु. किलो, जास्तीत जास्त 100 रु. किलो, तर सरासरी 75 रु. किलो दर निघाले.

नायजेरियामध्ये चर्चवर हल्ला; ५० हून अधिक ठार

भुसार मार्केटमध्ये गव्हाची 8 क्विंटल आवक झाली. कमीत कमी 2200 रु., जास्तीत जास्त 2225 तर सरासरी 2210 भाव निघाले. हरबरा 4 क्विंटल आवक झाली. कमीत कमी 4000 रु. जास्तीत जास्त 4100 व सरासरी 4050 भाव निघाले. सोयाबीन 21 क्विंटल आवक झाली. कमीत कमी 5300 रु. जास्तीत जास्त रु. 6000, तर सरासरी 5800 भाव निघाले. मका 9 क्विंटल आवक झाली. 2050 रुपये भाव निघाले.

Back to top button