ट्विटर कंपनीने २५ वर्षीय तरुणाला काढल्‍यानंतर त्‍याने केली अशी पोस्‍ट

ट्विटर
ट्विटर

पुढारी ऑनलाईन : ट्विटर हा सध्या चर्चेचा विषय बनत आहे. ट्विटरमधून एका 25 वर्षीय यश अग्रवालला नोकरीवरून काढण्यात आले. यानंतर यशने सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो शेअर केला आणि त्‍याला काढून टाकल्याची माहिती मित्र आणि फॉलोअर्ससोबत शेअर केली.

यश अग्रवालला आपली नोकरी गेल्‍याबद्‌दल दु:ख झाले नसून उलट त्‍याने ट्विटर सोबत घालवलेल्या वेळेची कदर करत ट्विटरच्या लोगोसह दोन उशींना धरलेले फोटोज शेअर केले.

यश अग्रवालने फोटोसोबत एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्‍याने लिहीले की, आत्ताच ट्विटरमधून मला काढून टाकले आहे. बर्ड अॅप, हा एक पूर्ण सन्मान होता, या कंपनीचा, आणि संस्कृतीचा भाग बनणे हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विशेषाधिकार होता, असे त्‍याने लिहले.

यशच्या या पोस्‍टनंतर त्‍याला अनेकांनी कमेंट्‌ केल्‍या

यश सोबत काम करण्या-या एका सहका-याने त्‍याला कमेंट करत लिहिले, तू एक हुशार व्यक्ती आहेस. ट्विटर तुमच्यासाठी भाग्यवान आहे! स्‍वत: काळजी घ्या आणि तुम्हाला काही करायचे असेल तर आम्‍ही येथे आहोत, असे त्‍याच्या सहका-याने पोस्‍ट केली.

तसेच, यश तुम्ही एक उत्तम व्यासपीठ तयार करण्यात मदत केली. आम्‍हाला खात्री आहे की तुझ्यासाठी नवीन काहीतरी वाट पाहत असेल, असे म्‍हणत दुस-या एका सहका-याने शुभेच्छा दिल्‍या.

दरम्‍यान, खर्च कमी करण्यासाठी आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी जास्त पैसे भरण्यापासून, कर्ज कमी करण्याच्या प्रयत्नात एलॉन मस्क यांनी सुमारे 3,700 कर्मचारी काढून टाकणार असल्‍याचे सांगितले. ट्विटर विकत घेतल्यानंतर मस्क यांनी कंपनीच्या 50 टक्‍के कर्मचार्‍यांना याबाबत कळवण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्मचार्‍यांनी सांगितले

याबाबत ट्विटर कर्मचार्‍यांनी सांगितले की कंपनी फेडरल आणि कॅलिफोर्निया कायद्याचे उल्लंघन करून कामगारांना पूर्व सूचना न देता काढून टाकत आहे आणि हे चुकीचे होत आहे, असे कर्मचा-यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news