अमृतसरमध्ये शिवसेना नेते सुधीर सुरी यांची गोळ्या झाडून हत्या

अमृतसरमध्ये शिवसेना नेते सुधीर सुरी यांची गोळ्या झाडून हत्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबमधील अमृतसरमध्ये शिवसेना नेते सुधीर सुरी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंदिरासमोर धरणे धरत असताना त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना आज (दि.४) घडली. गोळीबारानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. शिवसेनेचे कार्यकर्ते सुरींना रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

गोपाल मंदिराबाहेर हिंदू संघटनांच्या नेत्यांनी धरणे आंदोलन केल्यामुळे स्थानिक रहिवाशांचा मोठा जनसमुदाय निषेध स्थळी जमला होता, असे याचाच फायदा घेत मंदिराबाहेर इतर हिंदू संघटनांच्या नेत्यांसोबत धरणे धरायला बसलेले शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर गर्दीतून कोणीतरी गोळीबार सुरू केला, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सुधीर सुरी शिवसेनेतील मोठा चेहरा होता. मूर्ती कचऱ्यात टाकण्यास विरोध करण्यासाठी गोपाळ मंदिराबाहेर सुरी धरणे देत होते. या दरम्यान, अज्ञाताने गर्दीचा फायदा घेत त्यांच्यावर गोळीबार केला. या हत्येनंतर पंजाबमधील कायदा आणि सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे. या हत्येमागे कोणाचा हात आहे. याचा तपास आम्ही तात्काळ करू, असे पोलिसांनी म्हटले आहे.

हल्लेखोराची ओळख पटलेली नाही

सुधीर सुरी यांच्यावर गोळी झाडणाऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांच्या उपोषणावेळी गोपाळ मंदिराबाहेर मोठा जमाव जमला होता. यावेळी पोलीस कर्मचारी तैनात नव्हते. दरम्यान, जमावातील कोणीही त्या चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला नाही.

दहशतवादी संघटनांकडून धमक्या देण्यात आल्या होत्या

काही दिवसांपूर्वी अमृतसरमध्ये हिंदुत्व आणि अन्य धर्माच्या अल्पसंख्याक समुदायाच्या नेत्यांना कॅनडा आणि इतर देशांमधील दहशतवादी संघटनांकडून धमक्या दिल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या कोणत्या दहशतवादी संघटनेकडून देण्यात आल्या, याचा खुलासा अहवालात करण्यात आलेला नाही. यादरम्यान सुधीर सुरी यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती.

तक्रारीनंतर पोलिसांनी मोहीम सुरू केली

अमृतसरमधील अल्पसंख्याक समाजातील हिंदू आणि अन्य धर्माच्या नेत्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दहशतवादी संघटनांशी संबंध जोडण्यास सुरुवात केली आहे. तसेच गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांना अटक केली तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला होता.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news