Thane News: शहापुरात ३५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; १० मुलांची प्रकृती गंभीर

Thane News: शहापुरात ३५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; १० मुलांची प्रकृती गंभीर

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : शहापुरातील भातसई आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून आज (दि. ३१) विषबाधा झाली. सुमारे ३५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून ५५ विद्यार्थ्यांवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातील १० मुलांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. Thane News

शहापूर तालुक्यातील वासिंद परिसरातील भतसई येथील संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील ३५० विद्यार्थ्यांना आज दुपारच्या सत्रात डाळ, भात, भाजी, गुलाबजाम असे जेवण देण्यात आले. जेवण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, अस्वस्थ वाटू लागले. अनेक विद्यार्थी चक्कर येऊन पडले. व्यवस्थापनाने शाळेतील शिक्षक आणि स्थानिकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने तत्काळ शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. ६० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यापैकी १० विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. Thane News

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news