Terrorist attack : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पोलिस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या

file photo
file photo

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील चदूरा परिसरातील सरकारी कार्यालयात घुसून दोन दहशतवादी काश्मिरी पंडिताची हत्या केली होती. या काश्मिरी पंडिताचे राहुल भट असे नाव आहे. यानंतर आज शुक्रवारी दहशतवाद्यांनी ( Terrorist attack ) पोलीस हवालदार रियाझ अहमद यांच्यावर गोळीबार केला. जखमी अवस्थेच त्यांनी रुग्णालयात नेण्यात येत असताना त्याचा मृत्यू झाला. येथील परिस्थीती चिंताजनक बनली आहे.

काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी ( Terrorist attack ) पुलवामा येथील गुदुरा ​​भागात शुक्रवारी (दि. १३) रोजी सकाळी एसपीओ रियाझ अहमद ठाकोर यांच्यावर घरी जावून गोळीबार केला. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. रियाझ अहमद ठाकोर हे तेथील स्थानिक रहिवासी होते.

काश्मीर झोन पोलिसांच्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट करून याबबातची माहिती दिली आहे. यात 'जखमी पोलिस कॉन्स्टेबल रियाझ अहमद ठाकोर यांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आम्ही त्याच्या आत्म्यास शांती लाभो यासाठी श्रद्धांजली अर्पण करत आहोत. याप्रसंगी रियाझ याच्या कुटुंबाच्या दुखात सहभागी होत असल्याचे म्हटले आहे.

काश्मीरमध्ये एका आठवड्यात दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेला हा दुसरा पोलीस कर्मचारी आहे. याआधी गेल्या शनिवारी दहशतवाद्यांनी एका पोलिसाला गोळ्या घालून ठार केले होते. यावेळी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले होते की, 'शहरातील जुनीमार भागातील जान रोडवर सकाळी ८.४० वाजण्याच्या सुमारास जम्मू-काश्मीर पोलिसांचे कॉन्स्टेबल गुलाम हसन यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार करून हत्या केली होती.'

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या दहशतवादी हल्ले करत आहेत. याच दरम्यान काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची काल गुरूवारी दहशतवाद्यांनी हत्या केली. यानंतर येथे राहणाऱ्या काश्मिरी पंडितांनी या हत्येविरोधात रास्ता रोको करुन केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर अनेक ठिकाणी मेणबत्त्या पेटवून जोरदार निदर्शने करण्यात आली. दरम्यान दहशतवाद्यांनी पोलिसांना टार्गेट करत त्याच्याकडे मोर्चा वळविला आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news