Gold prices today : ऐन लग्नसराईत सोने झाले स्वस्त, जाणून घ्या १८ ते २२ कॅरेटचा दर! | पुढारी

Gold prices today : ऐन लग्नसराईत सोने झाले स्वस्त, जाणून घ्या १८ ते २२ कॅरेटचा दर!

पुढारी ऑनलाईन डेस्क

Gold prices today : सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठा बदल झाला आहे. २४ कॅरेट सोने ७३१ रुपयांनी स्वस्त होऊन दर प्रति १० ग्रॅम ५०,३८७ रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरातही घट झाली आहे. चांदी प्रति किलो ५९,७९६ रुपयांवरून ५९,२०७ रुपयांवर आली आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, (Gold prices today) शुक्रवारी २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ५०,३८७ रुपये, २३ कॅरेट ५०,१८५ रुपये, २२ कॅरेट ४६,१५४ रुपये, १८ कॅरेट सोने ३७,७९० रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा भाव २९,४७६ रुपये आहे. चांदी प्रति किलो ५९,२०७ रुपये आहे.

दरम्यान, MCX वर सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५०,१३५ रुपये होता. तर चांदी प्रति किलो ५८,८६५ रुपये होती. रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्याने सोन्याच्या दरावर परिणाम झाला असल्याचे सराफा बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या आठवड्यात सराफा बाजारातील दरातील घसरण ही ३ टक्क्यांहून अधिक आहे. दोन महिन्यांतील ही सर्वात मोठी घसरण आहे.

गुंतवणूकदारांचा डॉलरकडे कल वाढला

डॉलरचे मुल्य उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. डॉलर मजबूत झाल्याने सोन्याच्या किमतीवर दबाव वाढला आहे. गुंतवणूकदारांचा सोन्याएेवजी डॉलरकडे कल वाढला आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

Back to top button