फुलाला सुगंध मातीचा : मालिकेत तेजश्री प्रधान हिची होणार एन्ट्री

tejashree pradhan
tejashree pradhan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत लवकरच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची एन्ट्री होणार आहे. शिर्डीमधल्या आनंद जत्रेत अष्टपैलू व्यक्तिमत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत कीर्ती सहभागी होणार आहे. या स्पर्धेचं सूत्रसंचालन तेजश्री प्रधान करणार आहे. ती सेलिब्रिटी होस्ट म्हणून या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे.

या भूमिकेविषयी सांगताना ती म्हणाली, 'फुलाला सुगंध मातीचा हा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या मालिकेत मी tejashree pradhan म्हणूनच एन्ट्री घेणार आहेत. खूप दिवसानंतर पुन्हा एकदा मालिकेत काम करते आहे. त्यामुळे उत्सुकता आहे. मालिकेत मी एका अनोख्या स्पर्धेचं सूत्रसंचालन करणार आहे.

ही व्यक्तिरेखा मला खूप आवडली. खास म्हणजे माझा या मालिकेतला लूक खूप विचारपूर्वक डिझाईन करण्यात आला आहे. कीर्तीच्या प्रवासात तिला tejashree ची साथ कशी मिळणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.'

शिर्डीमध्ये भरवण्यात आलेली अष्टपैलू व्यक्तिमत्व ही स्पर्धा कीर्तीसाठी अतिशय महत्त्वाची असून यानिमित्त्ताने तिच्या बुद्धीमत्तेची आणि हजरजबाबीपणाची कसोटी लागणार आहे. कीर्ती ही स्पर्धा जिंकणार का? tejashree तिला कशी मदत करणार? हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल. त्यासाठी पाहायला विसरु नका फुलाला सुगंध मातीचा सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news