Tedros Adhanom Ghebreyesus : WHO चे ‘तुलसीभाई’ भारत भेटीवर; PM मोदींकडून स्वागत 

Tedros Adhanom Ghebreyesus
Tedros Adhanom Ghebreyesus
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) गुजरातमधील गांधीनगर येथे दोन दिवसीय शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी आज (दि.१६) भारतात आले आहेत. त्यांचे स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. (Tedros Adhanom Ghebreyesus) त्यांनी ट्विट करत भारतात आपले स्वागत आहे! असं म्हंटल आहे.

Tedros Adhanom Ghebreyesus : तुलसीभाई…टेड्रोस अधानोम घेब्रेयसस

"माझा चांगला मित्र तुलसीभाई नवरात्रीची चांगली तयारी करत आहे! भारतात आपले स्वागत आहे!" पंतप्रधानांनी आयुष मंत्रालयाची एक एक्स पोस्ट शेअर केली ज्यामध्ये घेब्रेयसस कार्यक्रमस्थळी दांडिया नृत्य करताना दिसत आहेत. 'तुलसी भाई' हे पंतप्रधान मोदींनी WHO प्रमुखांना दिलेले गुजराती नाव आहे. गेल्या वर्षी ग्लोबल आयुष इन्व्हेस्टमेंट अँड इनोव्हेशन समिटमध्ये संबोधित करताना मोदी म्हणाले होते, "टेड्रोस माझा चांगला मित्र आहे.

भारतात होणारी ही शिखर परिषद पुरावे आणि शिक्षण, डेटा आणि नियमन, जैवविविधता आणि नवकल्पना आणि डिजिटल आरोग्य या मुख्य संकल्पनेभोवती केंद्रित आहे. शिखर परिषदेदरम्यान होणार्‍या G20 मंत्र्यांसोबतचा संयुक्त संवाद हा समाज आणि अर्थव्यवस्थांच्या कल्याणासाठी स्वदेशी ज्ञान आणि पारंपारिक औषधांच्या योगदानावर लक्ष केंद्रित करेल. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus ) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत म्हंटलं आहे की,"  नमस्ते भारत! पारंपारिक औषध ग्लोबल परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी आज मी आलो आहे. भारतात आल्याचा आनंद झाला आहे.

एका निवेदनात, डब्ल्यूएचओने म्हटले आहे की शिखर परिषद राजकीय बांधिलकी आणि लोकांच्या आणि ग्रहाच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी पारंपारिक औषधांच्या पुराव्या-आधारित एकात्मतेच्या दिशेने सामूहिक कृती उत्प्रेरित करेल.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news