नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महिलांसंबंधी कायदेशीर बाबीतील युक्तिवाद आणि निर्णयामध्ये साचेबंद शब्दांचा वापर न करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court ) घेतला आहे. सरन्यायाधीश डी.व्हाय.चंद्रचूड यांनी न्यायालयीन निर्णयात लैंगिक रूढीवादी शब्दांसंबंधी एक हस्तपुस्तक जारी केले. न्यायाधीश आणि कायदे क्षेत्राला महिलासंबंधी रूढीवादी शब्दांचा वापर करण्यापासून परावृत्त करण्यासाठी 'लैंगिक रूढीवादाचा सामना' हे पुस्तिका जारी करण्यात आली आहे.
यापूर्वी देण्यात आलेल्या काही निर्णयांमध्ये महिलांसंबंधी वापरण्यात आलेले शब्द देखील यातून सांगण्यात आले आहेत. हे शब्द अयोग्य आहेत. भूतकाळात न्यायाधीशांकडून या शब्दांचा वापर करण्यात आल्याचे सरन्यायाधीशांनी यावेळी सांगितले. हस्तपुस्तिकामध्ये लिंग अन्यायकारक अटींचा शब्दकोष आहे आणि पर्यायी शब्द किंवा वाक्ये सुचवतात जी याचिका, आदेश आणि निर्णयांमध्ये वापरली जाऊ शकतात.
हस्तपुस्तिकाचा उद्देश टीका करणे अथवा निर्णयावर संशय निर्माण करणे नाही; परंतु अनावधानाने रूढीवादी शब्दांचा कसा वापर केला जाऊ शकतो. विशेषतः महिलाविरोधात हानिकारक रूढीवादितेचा उपयोग विरोधात जागरूकता वाढवण्यासाठी हस्तपुस्तिका जारी केली आहे. रूढीवादीता नेमकी काय आहे हे सांगण्याचा उद्देश असल्याचे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. ही पुस्तिका सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड केली जाणार आहे.