Team of Bodyguard to protect Tomatoes : टोमॅटोचे दर वाढल्याने विक्रेत्याने ठेल्याजवळ नेमली बाउंसर्सची टीम

Team of Bodyguard to protect Tomatoes
Team of Bodyguard to protect Tomatoes

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. दरम्यान, उत्तरप्रदेशातील एका टोमॅटो विक्रेत्याने टोमॅटोचे ग्राहकांपासून रक्षण करण्यासाठी चक्क बाउंसर्सची टीम नेमली आहे. वाराणसीतील एका भाजी विक्रेत्याने टोमॅटोच्या रक्षणासाठी हा निर्णय घेतला आहे. अजय फौजी असे या भाजी विक्रेत्याचे नाव आहे. विक्रेत्याने टोमॅटोसाठी बाऊंसर्सची टीम नेमल्यामुळे सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Team of Bodyguard to protect Tomatoes)

अजय फौजी बाउंसर्स नेमण्याच्या त्यांच्या निर्णयाबद्दल सांगतात की, "टोमॅटोचे भाव खूप जास्त असल्याने मी बाउंसर्स नेमले आहेत. लोक हिंसाचारात गुंतले आहेत आणि टोमॅटोची लूटही करत आहेत. आमच्या दुकानात टोमॅटो असल्याने आम्हाला वाद नको आहेत, त्यामुळे आमच्याकडे येथे बाउंसर आहेत. टोमॅटो रु. 160 प्रति किलो. लोक 50 किंवा 100 ग्रॅम विकत घेत आहेत," अजय फौजी या विक्रेत्याने म्हटले आहे. (Team of Bodyguard to protect Tomatoes)

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news