Rohit Sharma Salary : कॅप्टन झाल्यानंतर रोहितचा पगार विराटपेक्षा जास्त असेल का? जाणून घ्या…

Rohit Sharma Salary : कॅप्टन झाल्यानंतर रोहितचा पगार विराटपेक्षा जास्त असेल का? जाणून घ्या...
Rohit Sharma Salary : कॅप्टन झाल्यानंतर रोहितचा पगार विराटपेक्षा जास्त असेल का? जाणून घ्या...
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Salary : रोहित शर्मा भारतीय क्रिकेटच्या एकदिवसीय (ODI) आणि टी २० (T20) संघाचा नवा कर्णधार बनला आहे. आता टीम इंडियाला नव्या उंचीवर नेण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. मुंबईच्या या स्फोटक फलंदाजाने कर्णधारपद स्वीकारले असले तरी आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान त्याच्यासमोर राहणार आहे. तथापि, कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली कायम आहे. तर रोहितकडे कसोटी संघात नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याला भारतीय कसोटी संघाचा (Vice Captain Test Team Rohit Sharma) उपकर्णधार बनवण्यात आले आहे. आता विराट कोहली आणि रोहित शर्माच्या वेतना संबधी सोशल मीडियात प्रश्न उपस्थित केले जात आहेत (Rohit Sharma Salary). ODI आणि T20 चा कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माला विराट कोहलीपेक्षा जास्त पगार मिळेल का? अशी खमंग चर्चा रंगली आहे. चलातर जाणून घेऊया रोहित आणि विराट यांना बीसीसीआयकडून सध्या किती पगार मिळतो ते…

कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना वार्षिक कराराच्या यादीत A+ (BCCI Grade-A players) श्रेणीत ठेवण्यात आले आहे. BCCI च्या करारानुसार, A+ लिस्टेड खेळाडूंना वार्षिक ७ कोटी रुपये पगार दिला जातो. विशेष बाब म्हणजे संघाच्या कर्णधारपदासाठी बीसीसीआय अतिरिक्त रक्कम पगारात जोडून देत नाही. त्याचप्रमाणे अ श्रेणीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वार्षिक ५ कोटी रुपये, बी श्रेणीच्या यादीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंना ३ कोटी रुपये आणि क श्रेणीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंना १ कोटी रुपये वार्षिक वेतन दिले जाते.

IPL 2022 मध्ये रोहितचे उत्पन्न विराट पेक्षा जास्त असेल…

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली IPL ची ट्रॉफी तब्बल ५ वेळा जिंकली आहे. मुंबई इंडियन्स (MI) २०१३, २०१५, २०१७, २०१९आणि २०२० हंगामात IPL चॅम्पियन बनले. रोहितला पुढील वर्षीच्या IPL मोसमात १५ कोटींऐवजी १६ कोटी देण्यात येणार आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तर्फे विराट कोहलीला १५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. त्याच्या आयपीएल पगारात २ कोटींची कपात करण्यात आली आहे. विराटला याआधी १७ कोटी रुपये पगार मिळत असे रेकॉर्डवरून समजते.

IPL मध्ये 'हिटमॅन'ची विराटपेक्षा ज्यादा कमाई…

IPL ही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आहे. या स्पर्धेतील रोहित शर्माच्या कमाईबद्दल बोलायचे झाल्यास त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे. या लीगमधून त्याने आतापर्यंत १४६.६ कोटी रुपये कमावले आहेत. तर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीनंतर 'हिटमॅन' रोहित शर्मा 'IPL T20 टूर्नामेंट'मध्ये सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे. यलो आर्मी CSK चा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा IPL मधून १५० कोटींहून अधिक कमाई करणारा एकमेव खेळाडू आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)चा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत १४३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news