Rohit Sharma Crying : रोहित शर्माला अश्रू अनावर, इंग्लंड विरुद्ध पराभव झाल्याने भावूक

Rohit Sharma Crying : रोहित शर्माला अश्रू अनावर, इंग्लंड विरुद्ध पराभव झाल्याने भावूक

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : rohit sharma crying : टी-20 विश्वचषक 2022 मधील भारतीय संघाचा प्रवास संपुष्टात आला आहे. सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघ या वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा भावूक झाला. डगआउटमध्ये बसला असताना तो त्याच्या पाणावलेल्या डोळ्यांमधील अश्रू पुसताना दिसत होता.

सामना संपल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू डगआऊटमध्ये पोहोचले. तेव्हा रोहित शर्मा भावूक झाल्याचे दिसले. बराच वेळ रोहित शर्मा राहुल द्रविडसोबत बोलताना दिसत होता. दोघांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर रोहित शर्मा भावूक झाला, त्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड त्याचे सांत्वन करताना दिसले.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने हा पहिला टी 20 विश्वचषक खेळला. भारताने पाकिस्तानवर विजय मिळवून या स्पर्धेची शानदार सुरुवात केली. भारताने सुपर-12 मध्ये केवळ एक सामना गमावून उपांत्य फेरी गाठली. पण इथे इंग्लंडच्या वादळी खेळाने टीम इंडियाला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. पहिला धक्का केएल राहुलच्या रूपाने बसला, तो 5 धावा करू बाद झाला. यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी झाली. संघाची धावसंख्या 56 असताना रोहित शर्मा बाद झाला. त्याला ख्रिस जॉर्डनने 27 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर आदिल रशीदने आपल्या फिरकीच्या जाळ्यात सूर्यकुमार यादवला अडकवले. सूर्या अगदी स्वस्तात म्हणजे 14 धावांवर माघारी परतला. हा टीम इंडियाला तिसरा धक्का होता. त्यावेळी संघाची धावसंख्या 75 होती. यानंतर हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांच्यात चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. कोहली 50 धावा केल्या. पण अर्धशतक पूर्ण करताच तो पुढच्या चेंडूवर जॉर्डनचा बळी ठरला. भारताने 136 धावांवर चौथी विकेट गमावली. यानंतर ऋषभ पंतही लगेचच बाद झाला. हार्दिक पांड्याने शेवटच्या काही षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केली. त्याने 33 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 63 धावा केल्या. पण तो 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला आणि भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 169 धावांचे लक्ष्य ठेवले.

टीम इंडियाच्या 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या ओपनर्सनी भारतीय गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. इंग्लिश सलामीवीर अॅलेक्स हेल्सने 183 च्या स्ट्राईक रेटने 86 धावा केल्या. कर्णधार जोस बटलरने 163 च्या स्ट्राईक रेटने 80 धावा केल्या. दोन्ही फलंदाजांनी कोणतीही चूक केली नाही आणि लक्ष्याचा पाठलाग अगदी सहज केला. त्यांनी 24 चेंडू राखून एकही विकेट न गमावता सामना जिंकला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news