पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli T20 4000 Run : विराट कोहलीचा आजच्या युगात क्रिकेट विश्वात असा दर्जा झाला आहे की, जेव्हा तो मैदानात येतो तेव्हा काही ना काही विक्रम त्याची वाट पाहत असतो. 2022 च्या टी-20 विश्वचषकात विराटने आपल्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडला आहे. विराटने उपांत्य फेरीतही इंग्लंडविरुद्ध अर्धशतक फटकावले. या खेळीदरम्यान त्याने 42 वी धावा घेताच आणखी एक खास विक्रमाला गवसणी घातली. तो आधीच टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनल होता आणि आता त्याने 4000 धावांचा टप्पा पार करून असा पराक्रम करणारा एकमेव खेळाडू ठरला आहे.
विराट कोहलीने आपल्या 115 व्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ही कामगिरी केली. 2022 च्या आशिया चषक स्पर्धेत त्याने अफगाणिस्तानविरुद्ध केलेल्या या फॉर्मेटमध्ये त्याच्या नावावर एक शतकही आहे. त्या खेळीसह त्याने आपल्या 71 व्या शतकाची प्रतीक्षा संपवली. सचिन तेंडुलकरच्या 100 शतकांनंतर विराट कोहली हा जगातील दुसरा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय शतक करणारा खेळाडू आहे. तसेच या विश्वचषकात विराट कोहलीच्या नावावर स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही नोंदवला गेला आहे.
विराट कोहली- 4008, 107 डाव
रोहित शर्मा- 3853, 140 डाव
मार्टिन गप्टिल- 3531, 118 डाव
बाबर आझम- 3323, 93 डाव
पॉल स्टर्लिंग- 3181, 120 डाव
विराट कोहलीने आजच्या सेमी फायनलमध्ये चार चौकार आणि एक षटकारसह 50 धावा केल्या. यावबरोबर त्याने टी 20 विश्वचषक स्पर्धेत 100 चौकारही पूर्ण केले. विराट कोहली 2022 च्या T20 विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 6 सामन्यात 296 धावा केल्या आहेत. यात चार अर्धशतकांचा समावेश आहे.