पुणे : माझ्या राजकीय जीवनात अनेकदा शिक्षण संस्था काम करत असताना अनेक अडचणी आल्या. शिक्षण बदललं असून इंग्रजी माध्यमात शिक्षण घेण्याचा पालकांचा कल वाढताना दिसत आहे. या हेतूने काही मराठी शाळा इंग्रजी कराव्या लागतील असं माझं आणि दीपक केसरकर यांचं याबाबाबत बोलणं झालं आहे. आपली मातृभाषा महत्वाची आहे, पण इंग्रजी जगाने हे मान्य केलं आहे. त्यामुळे याचा वेगळा अर्थ कोणीही काढता कामा नये. मराठी आलीच पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी पुण्यात जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात अजित पवार आणि चंद्रकांत पाटील एकत्र आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले, काही ठिकाणी मराठी बरोबरच इंग्रजी शाळाही आहेत. शिरूर मुळशी आणि आंबेगावचा निकाल चागला लागला आहे. आणि कमी निकाल कुठला तर बारामती, आता कपाळ माराव का? आम्ही सकाळपासून काम करायचं, आणि आमच्या इथं आला शून्य निकाल. मी सगळ्यात जास्त खर्च शिक्षण विभागवर करतो. हवेलीतील शिक्षकांना तर सारख्या बदल्या हव्या असतात. दादा इकडे द्या? दादा तिकडे द्या. आता हे माझ्या हातात आहे का. असं म्हणत त्यांनी दुजोरा दिला.
जिल्हयातील काही शाळांचा निकाल चागला तर काही शाळांचा कमी आहे. त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. भोर, वेल्हा, मुळशी या भागात शिक्षकांच्या संख्या कमी आहे. त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांवर होत असतो. यामुळे सुरज मांढरे यांना शिक्षण आयुक्त काम दिले आहे. सर्व शिक्षकांना विनंती आहे. आम्ही पालकमंत्री, शिक्षणमंत्री यांना सांगून अडचणी सोडवू. पण बाबांनो मुलांना चांगलं शिक्षण द्या. काही धोरणात्मक बदल करू, चांगले निकाल द्या, परिस्थिती बदला. असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
शाळेच्या नावात इंग्लिश असून काही उपयोग नाही, त्यामुळे शिक्षकांनी आधी चांगलं इंग्लिश शिकायला हवं, भीती मनात न बाळगता शिकल पाहिजे. गैरसमज करू नका मराठी यायला हवी पण इंग्लिश शिकलच पाहिजे. कारण आज जगामध्ये, देशांमध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये चारित्र्य संपन्न पिढी निर्माण करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार झाले पाहीजे, त्यांना नुसते भाषण करून उपयोग नाही. पूर्वी डॉक्टर वकील इंजिनिअरिंग करायच म्हणायचे. पण आता विद्यार्थी आयएएस, आयपीएस व्हायच आहे, अस सांगतात. असेही अजित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा