नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : एअर इंडियाच्या विमानात महिलेच्या अंगावर प्रवाशाने केलेल्या लघुशंका प्रकरणी टाटा सन्सचे प्रमुख एन चंद्रशेखरन यांनी एक निवेदन प्रसिद्ध करुन याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Pee on Plane Row )
एन चंद्रशेखरन यांनी निवेदनात म्हटलं आहे की, "26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाने उड्डाण केलेल्या एआयआय०२ विमानात घडलेली घटना माझ्यासाठी आणि एअर इंडियामधील माझ्या सहकाऱ्यांसाठी वैयक्तिक वेदनादायक बाब आहे. याप्रकरणी एअर इंडियाचा प्रतिसाद अधिक जलद असायला हवा होता. आम्ही परिस्थिती योग्यरितेन हाताळण्यास अपयशी ठरलो."
टाटा समूह आणि एअर इंडिया आमच्या प्रवासी आणि क्रू यांच्या सुरक्षेसाठी आणि हितासाठी खंबीरपणे उभे आहेत. आम्ही अशा अनियंत्रित स्वरूपाच्या कोणत्याही घटना टाळण्यासाठी किंवा संबोधित करण्यासाठी प्रत्येक प्रक्रियेचे पुनरावलोकन करण्याचा आणि दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाहीही एन चंद्रशेखरन यांनी निवेदनाच्या माध्यामातून दिले आहे.
हेही वाचा :