Best Indian Curries: जगातील १० बेस्ट करीजमध्ये भारताच्या मलाई कोफ्तासह ‘या’ पदार्थांचा समावेश

file photo
file photo

Best Indian Curries : भारताच्या डिशेज (Indian Dishes) इतक्या चविष्ट असतात की, याबद्दल वेगळं काही सांगायला नको. वेगवेगळ्या पदार्थांची चव आपण चाखलीच आहे. आता भारताच्या ३ करीज (Best Indian Curries) ने वर्ल्ड टॉप १० मध्ये आपले स्थान पक्के केले आहे. टेस्ट ॲटलस (Taste Atlas) ने आपल्या '१० बेस्ट रेटिड करीज' ची यादी जारी केलीय. यामध्ये शाही पनीर (Best Indian Curries) चौथ्या क्रमांकावर आहे. मलाई कोफता (Malai Kofta) पाचव्या आणि बटर चिकन (Butter Chicken) सहाव्या क्रमांकावर आहे.

या यादीमध्ये थायलंडच्या Phanaeng Curry ला पहिले स्थान मिळाले आहे. नॉर्दर्न थायलंडच्या Khoa soi ला दुसरा, जपान Kare ला तिसरा, शाही पनीर चौथा, मलाई कोफता पाचवा, बटर चिकनला सहावा, सेंट्रल थायलंडच्या ग्रीन करीला सातवा, थायलंडच्या मस्सासन करीला आठवा, जपानच्या Kare raisu ला ९ वा आणि १० वे स्थान थायलंडच्या थाई करीला मिळाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news