T20 World Cup Australia : विश्‍वचषक स्‍पर्धेतून यजमान ऑस्‍ट्रेलिया आऊट, इंग्‍लंड सेमी फायनलमध्‍ये

T20 World Cup Australia : विश्‍वचषक स्‍पर्धेतून यजमान ऑस्‍ट्रेलिया आऊट, इंग्‍लंड सेमी फायनलमध्‍ये

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : श्रीलंके.विरुद्धच्‍या 'करो या मरो' मुकाबल्‍यात विजय मिळवत टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या सेमी फायनलमध्‍ये  आज इंग्‍लंडने मोठ्या दिमाखात प्रवेश केला. ( T20 World Cup Australia ) इंग्‍लंडच्‍या विजयामुळे ऑस्‍ट्रेलिया संघ विश्‍वचषक स्‍पर्धेतून बाद झाला आहे. आता ग्रुप १ मध्‍ये न्‍यूझीलंड आणि इंग्‍लंड संघांनी सेमी फायनलमध्‍ये ( उपांत्‍य फेरीत ) धडक मारली आहे.

ऑस्‍ट्रेलियाची खराब सुरूवात, इंग्‍लंडचा सामना रद्द झाल्‍याचा फटका

यंदाची विश्वचषक स्पर्धा ऑस्‍ट्रेलियात असल्याने सर्वांचे लक्ष ऑस्‍ट्रेलिया संघाच्‍या कामगिरीकडे लागले होते. मात्र सुपर 12 मधील पहिल्याच सामन्‍यात ऑस्‍ट्रेलियाच्‍या संघाने सुमार कामगिरी केली. न्‍यूझीलंडने ऑस्‍ट्रेलियाचा तब्‍बल ८९ धावांनी पराभव केला हाेता. या स्‍पर्धेतील सुपर-12च्‍या ग्रप १मध्‍ये ऑस्‍ट्रेलियाने पाच सामन्‍यांपैकी तीन सामन्‍यांमध्‍ये विजय मिळवला. न्‍यूझीलंड विरुद्ध पराभव तर इंग्‍लंड विरुद्‍धचा सामना पावसामुळे रद्‍द झाला होता. याचा फटका टीम ऑस्‍ट्रेलिया टीमला बसला आणि  विश्‍वचषक स्‍पर्धेतून बाद होण्‍याची नामुष्‍की या संघावर ओढवली.

 T20 World Cup Australia : अफगाणिस्ताननेही ऑस्ट्रेलियास झुंजवले

ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने 20 षटकांत 164 धावांपर्यंत मजल मारली होती. अफगाणिस्तानच्या राशिद खानने पडझडीनंतर झुंजार खेळी करत 23 चेंडूंत नाबाद 48 धावा चोपल्या; पण सामना जिंकूनही यजमान संघ सेमीफायनलपासून अद्याप लांबच असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले होते. कारण ऑस्‍ट्रेलियाचा रनरेट हा -0.173 होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियालाचे लक्ष इंग्लंड-श्रीलंका सामन्याकडे लागले होते. इंग्‍लंडला सेमीफायनलमध्‍ये धडक मारण्‍यासाठी विजय अनिवार्य होता. अखेर इंग्‍लंडने श्रीलंकेचा परा‍भव केल्याने ऑस्‍ट्रेलिया संघाचा या स्‍पर्धेतील प्रवास थांबला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news