T20 World Cup 2024 : न्यूझीलंडचा संघ जाहीर; विल्यमसन कर्णधार, कॉनवेचे पुनरागमन

आगामी T20 विश्वचषक 2024 साठी न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला आहे.
आगामी T20 विश्वचषक 2024 साठी न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला आहे.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आगामी T20 विश्वचषक 2024 साठी न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला आहे. अनुभवी केन विल्यमसनला संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे, तर दुखापतीमुळे 'आयपीएल'मधून बाहेर पडलेला डेव्हॉन कॉनवे संघात परतला आहे. दरम्‍यान, संघ जाहीर करणारा न्यूझीलंड हा पहिला देश आहे. आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सर्व संघांdh संभाव्य १५ खेळाडूंच्‍या नावाची घोषणा करण्याची अंतिम तारीख १ मे ठेवली आहे.

विल्यमसनची कर्णधार म्‍हणून चौथी विश्वचषक स्‍पर्धा

विल्यमसनचा खेळाडू म्हणून हा सहावा टी२० विश्वचषक आणि कर्णधार म्हणून चौथी टी२० विश्वचषक स्पर्धा आहे. न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी सांगितले की, जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या टी-20 स्पर्धेदरम्यान संघांमधील परिस्थिती लक्षात घेऊन संघाची निवड करण्यात आली आहे.

परिस्थितीनुसार आम्ही आमचा संघ निवडला : प्रशिक्षक गॅरी स्टेड

संघनिवडी बाबत न्‍यूझीलंड संघाचे प्रशिक्षक गॅरी स्‍टेड म्‍हणाले की, वेस्ट इंडिजमधील परिस्थिती खूपच वेगळी आणि आव्हानात्मक असेल, अशी आमची अपेक्षा आहे. त्या परिस्थितीनुसार आम्ही आमचा संघ निवडला आहे. मला सर्व निवडक खेळाडूंचे अभिनंदन करायचे आहे. विश्वचषक स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू खास आहेत.

वरिष्ठ खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त असल्याने अनेक वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत किवी संघाने अलीकडेच पाकिस्तानचा दौरा केला. मायकेल ब्रेसवेलच्या नेतृत्वाखाली किवी संघाने पाकिस्तानविरुद्धची पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली आहे.

न्‍यूझीलंडचा संघ

कॉनवे आणि ॲलन यांना सलामीची जबाबदारी दिली जाऊ शकते. त्याचवेळी विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर आणि रचिन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. मग डॅरिल मिशेल आणि नीशम फटकेबाजीत प्रवीण आहेत.  तर ब्रेसवेल, सँटनर आणि सोधी फिरकीपटू म्‍हणून महत्त्‍वाची जबाबदारी संभाळतील.  वेगवान गोलंदाजीची जबाबदारी अनुभवी सौदी, हेन्री आणि फर्ग्युसन यांच्यावर असेल. डॅरिल चौथ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका बजावू शकतो. किवी संघाने वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकीपटूंना संधी दिली आहे.

न्यूझीलंडचा T20 विश्वचषक संघ

केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी.

T20 विश्वचषकासाठी संघ जाहीर करणारा न्यूझीलंड पहिला देश

१ जूनपासून टी-२० विश्वचषकाला सुरुवात होत आहे. 2024 च्या T20 विश्वचषकासाठी संघ जाहीर करणारा न्यूझीलंड हा पहिला देश आहे. आयसीसीने सर्व संघांसाठी संभाव्य १५ ची घोषणा करण्याची अंतिम तारीख १ मे पर्यंत ठेवली आहे. भारतीय संघाची घोषणा १ मे रोजी होण्याची शक्यता आहे. किवी संघ 7 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्याचवेळी भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २९ जून रोजी होणार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news