स्वाती मालीवालांना दिल्‍ली मुख्यमंत्र्यांच्या सहकार्‍याकडून मारहाण : दिल्ली पोलीस

स्वाती मालीवालांना दिल्‍ली मुख्यमंत्र्यांच्या सहकार्‍याकडून मारहाण : दिल्ली पोलीस

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्‍लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी कर्मचाऱ्याने मारहाण केल्‍याचा आरोप आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी केला आहे, अशी माहिती आज (दि.१३) दिल्‍ली पोलिसांनी दिली. दरम्‍यान या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही, असे दिल्‍ली पोलिसांनी स्‍पष्‍ट केले आहे. दरम्‍यान, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान किंवा आम आदमी पक्षाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

स्वाती मालीवाल आज सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गेल्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरातील कर्मचार्‍याने गैरवर्तन केल्याचा त्‍यांनी आरोप केल्‍याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र या प्रकरणी पोलिसांकडे अद्याप औपचारिक तक्रार आलेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शाब्दिक बाचाबाचीनंतर मालीवाल यांनी पीसीआर कॉल देखील केला. सकाळी 10 वाजता दोन फोन आले. यानंतर सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याचे पथक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती मालीवाल यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिल्ली पोलिसांनी तक्रार घेतली आहे, मात्र अधिकृतपणे काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सकाळी 9:34 वाजता पीएस सिव्हिल लाइन्स येथे एक पीसीआर कॉल आला, ज्यामध्ये एका महिलेने सांगितले की सीएम हाऊसमध्ये तिच्यावर हल्ला करण्यात आला. काही वेळाने खासदार मालीवाल सिव्हिल लाइन्समध्ये आल्या, मात्र नंतर तक्रार करणार असल्याचे सांगून निघून गेल्या.

सोमवारी सकाळी दिल्ली पोलिसांना सलग दोन फोन आले. हे दोन्‍ही फोन सिव्हिल लाइन्समधील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून आले होते. AAP नेत्या स्वाती मालीवाल असल्याचा दावा करणाऱ्या कॉलरने सांगितले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी विभव कुमार यांनी हल्ला करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली मात्र यावेळी तेथे स्वाती मालीवाल उपस्‍थित नव्‍हत्‍या.

प्रोटोकॉलनुसार दिल्ली पोलीस पूर्वपरवानगीशिवाय मुख्यमंत्र्यांच्या घरात प्रवेश करू शकत नाहीत. दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "सकाळी 9:34 वाजता पीएस सिव्हिल लाईन्स येथे एका महिलेचा एक पीसीआर कॉल आला होता की मुख्यमंत्र्यांच्या घरी तिच्यावर हल्ला करण्यात आला आहे. काही वेळाने खासदार मालीवाल पीएस सिव्हिल लाईन्समध्ये आल्या, पण या

तक्रार करणार असल्‍याचे सांगून त्या निघून गेल्या

पोलीस सध्या पीसीआर कॉल्सची सत्यता तपासत आहेत आणि या प्रकरणाची अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्याप लेखी तक्रार दाखल झालेली नाही.स्वाती मालीवाल या दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यानंतर त्या राज्यसभेच्या खासदार झाल्या आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news