Swara Bhaskar: स्वराने आपल्या लाडलीचं ठेवलेलं नाव खूपचं खास, तुम्हाला अर्थ माहितीये का?

swara-fahad
swara-fahad
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करने २३ सप्टेंबर रोजी नन्ही परीला जन्म दिला. आता तिने आपल्या लाडलीचे नावदेखील ठेवले आहे. तिचा पती फहाद अहमदने आपल्या मुलीचे नाव राबिया ठेवला आहे. (Swara Bhaskar) या नावाचा अर्थदेखील खास आहे. ही गोड बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वरा भास्करने आपल्या फॅन्ससोबत शेअर केलं आहे. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक फोटो शेअर करत आपल्या बाळाचे नावदेखील सांगितले. (Swara Bhaskar Baby Girl)

राबियाचा अर्थ काय?

स्वरा – फहद अहमदने जुलीचे नाव राबिया ठेवलं आहे. हे एक सूफी संताच्या नावावर ठेवल्याचे म्हटले जाते. राबिया बसरी इराकचे राहणारे एक सूफी संत होत्या. ज्यांना इराकच्य़ा पहिली महिला सूफी संत मानले जाते.

एक नवीन जग : स्वरा

आपल्या मुलीसोबतचे सुंदर फोटो शेअर करत स्वराने कॅप्शनमध्ये लिहिलं की 'एक प्रार्थना ऐकण्यात आली, एक आशीर्वाद देण्यात आला. एक गीत ..एक रहस्यमय सत्य…आमची मुलगी राबियाचा जन्म २३ सप्टेंबर, २०२३ रोजी झाला. अगदी नवं जग आहे…'

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news