सांगली जिल्हा बँकेत स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसात धक्काबुक्की

सांगली जिल्हा बँकेत स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसात धक्काबुक्की
सांगली जिल्हा बँकेत स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसात धक्काबुक्की

सांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत माेर्चावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यामुळे जिल्हा बँकेत वातावरण तणावपूर्ण बनले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी बँकेच्या पायरीवर ठिय्या मारून जोरदार घोषणाबाजी केली.

येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत बड्या थकबाकीदारांचे कर्ज माफ करायचा निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चा काढला होता. परंतु यावेळी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला. यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना फरफटत दिल्याचा प्रकार घडला. त्यामुळे जिल्हा बँकेत वातावरण तणावपूर्ण बनले आहेत. संचालक विशाल पाटील पृथ्वीराज पाटील यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु संतप्त कार्यकर्त्यांनी बँकेच्या पायरीवर ठिय्या मारून जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचलं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news