Sushmita Sen : सुश्मिता सेनने घेतलेल्या नवीन कारची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क…(व्हिडिओ)

Sushmita Sen's New Car
Sushmita Sen's New Car

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या सौंदर्याने लाखों दिलो की धडकन बनलेल्या अभिनेत्री सुश्मिता सेनने Sushmita Sen शनिवारी (दि. २१) आपल्यासाठी एक खास कार घेतली आहे. या कारचे फोटो आणि व्हिडिओ स्वतः सुश्मिताने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावेळी फॅन्सनी तिचे भरभरून कौतुक तर केलेच आहे सोबत तिच्या या नव्या कोऱ्या कारची किंमतही विचारली जात आहे. तर या आलीशान कारची किंमत तब्बल १.९२ कोटी रुपये आहे. Sushmita Sen

माजी मिस युनिव्हर्स असलेली सुश्मिता सेन Sushmita Sen एक स्वछंदी जगणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपण स्वतःवरती भरभरून प्रेम केले पाहिजे असे ती सतत सांगत असते. याच धर्तीवर ही आलिशान कार घेऊन ती स्वतःला गिफ्ट देत असल्याची पोस्टही तिने सोशल मीडियावर केली आहे. ही कार 'मर्सिडीज एएमजी जीएलई 53 कूप' असून जगातील आलीशान कार पैकी ही एक असल्याचे बोलले जाते. सध्या 'आर्या ३' चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त असलेल्या सुश्मिताने तिच्या इंस्टाग्रामवर चित्रपट आणि सोबत तिच्या नव्या कारबद्दल लिहलेल्या पोस्टला फॅन्सनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. Sushmita Sen

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

हे ही नक्की वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news