Emergency Movie : चित्रपटासाठी ‘घर गहाण’ ठेवलं, कंगना रनौतचा मोठा खुलासा | पुढारी

Emergency Movie : चित्रपटासाठी 'घर गहाण' ठेवलं, कंगना रनौतचा मोठा खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत तिचा आगामी चित्रपट ‘इमरजेंसी’च्या शूटिंगमध्ये खूप बिझी आहे. या चित्रपटासाठी ती प्रचंड मेहनत घेताना दिसतेय. या चित्रपटामध्ये ती इंदिा गांधी यांच्या भूमिकेत असून निर्माती म्हणूनही काम पाहत आहे. (Emergency Movie) या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले, अशी माहिती स्वत: कंगना रनौतने इन्स्टाग्रामवरून दिलीय. त्याचसोबत तिने इमोशन नोट लिहून शूटिंग दरम्यानचे काही फोटोही शेअर केले आहेत. (Emergency Movie)

कंगनाच्या इमरजन्सीची चर्चा सध्या सुरु आहे. तिने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. शूटिंग पूर्ण केल्यानंतर कंगनाने इन्स्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहिलीय. पोस्टमध्ये तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. कंगनाने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, तिने इमरजन्सी चित्रपटासाठी आपले घर गहाण ठेवले आहे. या पोस्टसोबत कंगनाने काही फोटो शेअर केले आहेत. या चित्रपटामध्ये ती दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींजींच्या भूमिकेत दिसणार आहे.

कंगनाने तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती इंदिरा गांधींच्या गेटअपमध्ये दिसत आहे. फोटो शेअर करत तिने लिहिलंय, “आज मी चित्रपट इमरजन्सीची शूटिंग पूर्ण केले. हा माझ्या आयुष्यातील सर्वांत शानदार काळाची समाप्ती आहे…असं वाटतं की, मी निवांतपणे प्रवास केला आहे. पण, सत्यापासून कोसो कोसों दूर आहे…”

कंगनाने गहाण ठेवले घर

कंगनाने म्हटलं आहे की, “तिने या चित्रपटासाठी किती समझोते केले आहेत. पहिल्या शेड्यूलच्या दरम्यान आपले सर्वकाही गहाण ठेवण्यापासून डेंगूविषयी माहिती होण्यापर्यंत अगणित वस्तू…खूप कमी ब्लड सेल काऊंटसोबत चित्रपट करणे..या दरम्यान एका व्यक्तीच्या रूपात माझं परीक्षण केलं गेलं.”

कंगनाने व्यक्त केल्या भावना

कंगना म्हणाली , “मी सोशल मीडियावर आपल्या भावनांविषयी खूप उघडपणे बोलते. मी या सर्व गोष्टी कधी शेअर केल्या नाहीत. मी माझं दु:ख त्या लोकांसोबत शेअर करू इच्छित नव्हते, जे विनाकारण चिंता करतात. ज्यांना माझं अपयश पहायचं आहे. मला कष्ट देण्यासाठी सर्व काही करत आहेत. मला त्यांना माझ्या दु:खाचं सुख द्यायचं नव्हतं.…”

यादिवशी रिलीज होणार ‘इमरजन्सी’

कंगनाचा हा चित्रपट ‘इमरजन्सी’ १४ जुलै २०२३ रोजी रिलीज होईल. यामध्ये अनुपम खेर, मिलिंद सोमन, महिमा चौधरी, सतीश कौशिक, श्रेयस तळपदे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

Back to top button