सुर्यकुमार यादव : ‘SKY’ ची मैदानात जबरदस्त वापसी

सुर्यकुमार यादव : ‘SKY’ ची मैदानात जबरदस्त वापसी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या १५ व्या मोसमात मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. याचे एक कारण म्हणजे त्यांचे काही खेळाडू दुखापतग्रस्त किंवा अनुपलब्ध होते. त्यापैकी सर्वात महत्वाच नाव म्हणजे त्यांचा ३१ वर्षीय भारतीय फलंदाज सुर्य कुमार यादव, जो 'SKY' या नावाने प्रसिद्ध ओळखला जातो. (SKY)

दुखापतीतून सावरल्यानंतर सूर्यकुमार अखेर बुधवारी मैदानात परतला, पुनरागमन करताना मोसमातील पहिल्याच सामन्यात त्याने जोरदार फटकेबाजी केली. मात्र, सुर्याने केलेल्या फटकेबाजीनंतरही मुंबईला विजयाला गवसणी घालता आली नाही. या सामन्यात कोलकाताने मुंबईचा पराभव केला. या मोसमातील मुंबईचा हा सलग तिसरा पराभव ठरला.(SKY)

आयपीएल २०२२ हंगामातील 14 व्या सामन्यात, मुंबई इंडियन्स संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी अवघ्या ५५ धावांत आघाडीचे तीन फलंदाजांच्या बाद झाले. ज्यात कर्णधार रोहित शर्मा (३) आणि हंगामातील सर्वात महागडा खेळाडू इशान किशनच्या (१४) विकेटचाही समावेश होता. यानंतर सूर्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदाना उतरला. यंदाच्या हंगामात प्रथमच फलंदाजी करताना आपल्या नैसर्गिक शैलीत फलंदाजी करत संघावरील दडपण कमी करण्यास सुरूवात केली.

मैदानात येताच सूर्यकुमारने आपले इरादे स्पष्ट केले. त्याने आपल्या जुना संघ केकेआर विरुद्ध ३४ चेंडूत आपले १३ वे IPL अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने युवा खेळाडू टिळक वर्मा (नाबाद ३८) सोबत चौथ्या विकेटसाठी महत्वाच्यान क्षणी ८३ धावांची भागीदारी केली. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सूर्या बाद झाला पण तोपर्यंत त्याने ३६ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांसह ५२ धावांची शानदार खेळी खेळली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने २० षटकांत ४ गडी गमावून १६१ धावा केल्या.

मंबुईने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करताना व्यंकटेश अय्यरच्या नाबाद ५० केल्या व पॅट कमिन्सने धमाकेदार फलंदाजी करत आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली, कोलकाताने १६ षटकांत विजय मिळवला. कमिन्सने या सामन्यात १५ चेंडूत नाबाद ५६ धावा केल्या. यासोबत गोलंदाजी करत त्याने २ बळी घेत विक्रमी खेळी केली.

आयपीएलच्या गेल्या काही हंगामापासून मुंबई इंडियन्ससाठी सुर्यकुमार यादव हा महत्वाचा खेळाडू ठरला आहे.. या फलंदाजाने २०२० पासून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी ३० डावांमध्ये १४४.३८ च्या सरासरीने त्याने ८४९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २३ षटकार आणि १०६ चौकार ठोकले आहेत. आत्तापर्यंत त्याने मुंबईसाठी ७ अर्धशतक केले आहेत आणि तो मधल्या फळीतील मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे.

आयपीएलमधल्या कारकिर्दीत सुर्यकुमार यादवने आतापर्यंत ११४ सामने खेळले आहेत ज्यात त्याच्या फलंदाजी करताना त्याने २३४१ धावा केल्या आहेत. आयपीएलच्या हंगामात त्याने आतापर्यंत १३ अर्धशतके झळकवली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news