सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘दुपारनंतर राऊत सगळे चॅनल टेकओव्हर करतील!’

Supriya Sule
Supriya Sule
Published on
Updated on

पुणे : पुढारी ऑनलाईन

शिवसेना नेते संजय राऊत आज दुपारी पत्रकार परिषदेत काय गौप्यस्फोट करतात याकडे सामान्य माणसांनाच नव्हे तर राजकीय नेत्यांनाही उत्सुकता लागून राहिली आहे. त्याचा प्रत्यय पुण्यातील एका कार्यक्रमात आला. राष्ट्रवादी कँाग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमात, 'आता सकाळीच काय ती पब्लिसिटी करून घ्या, दुपारनंतर संजय राऊत सगळे चॅनल टेकओव्हर करतील' असे वक्तव्य करून राऊतांच्या पत्रकारपरिषदेबाबत उत्कंठा आणखी वाढवली आहे.

पुण्यात एका कार्यक्रमासाठी भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी चंद्रकांत पाटलांनी राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर भाष्य केले. त्याचाच धागा पकडून सुप्रिया सुळे यांनी हा टोला लगावला. त्या म्हणाल्या चॅनलवाले आमच्या कॉमेंट्सवर चालवता…मग तुम्ही आम्हाला त्याचे पैसे दिले पाहिजेत. मात्र आता जे काही करायच आहे ते दुपारी ३ वाजण्याच्या आत करू. ३ नंतर राऊतांचा बोलबाला असेल.

आपण वाट बघू ते काय बोलतात ते. ते काहीतरी महत्त्वाचे बोलतील, कारण त्यांनी तसा इशाराच दिला आहे. सगळा देश त्यांना बघणार आहे. मी पण बघणार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, आज सकाळपासूनच मला सगळेजण विचारताहेत कीराऊत काय बोलणार? आता ते मला कसे  कळणार? त्यातच चंद्रकांत पाटलांनी आपल्या भाषणात सुप्रिया सुळेंना राज्यसभेच्या खासदार संबोधले… चूक लक्षात येताच त्यांनीसुधारणा केली; मात्र 'काल दत्ता भरणे मामा फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणाले, आज मी तुम्हाला अस बोललो', असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी वेळनिभावून नेली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news