द्रमुक खासदार कनिमोळी यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

MP Kanimooli
MP Kanimooli

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : द्रमुक नेत्या, लोकसभा खासदार कनिमोळी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. तामिळनाडूच्या तूतीकोरिन लोकसभा मतदार संघातून कनिमोळी यांच्या २०१९ मधील निवडीला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने गुरूवारी फेटाळली. मद्रास उच्च न्यायालयाने ही याचिका रद्द करण्यास यापूर्वी नकार दिला होता.न्यायालयाच्या या निर्णयाला कनिमोळी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्या.बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाने कनिमोळी यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाखल केलेली याचिका स्वीकारली आहे.

कनिमोळी यांनी निवडणूक आयोगात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून पतीच्या पॅन कॉर्ड क्रमांकाचा उल्लेख केला नाही,असा दावा करीत एका मतदाराने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पंरतु, पती विदेशी नागरिक असल्याने त्यांच्याकडे अशाप्रकारचे कुठलेही कार्ड नाही. देशात त्यांचे कुठलेही आर्थिक कार्य नाही, असा युक्तिवाद कनिमोळी यांच्या वकिलाकडून करण्यात आला.

पती सिंगापूरचे रहिवासी असल्याने पॅन कार्ड संदर्भातील याचिकाकर्त्यांच्या तर्क आधारहीन आहे,असे देखील कनिमोळींच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. २६ एप्रिलला याचिकेवरील आदेश न्यायालयाने राखून ठेवला होता. ५५% मतांनी निवडून आल्यामुळे सादर करण्यात आलेल्या माहितीने मतदार संतुष्ट आहेत,असा युक्तिवाद वरिष्ठ वकील पी.विल्सन यांनी कनिमोळी यांच्यावतीने केला होता.

.हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news