केडगाव स्टेशन स्मशानभूमी जीर्ण; सुसज्ज, अद्ययावत करण्याची ग्रामस्थांकडून मागणी | पुढारी

केडगाव स्टेशन स्मशानभूमी जीर्ण; सुसज्ज, अद्ययावत करण्याची ग्रामस्थांकडून मागणी

खोर(ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : केडगाव येथील केडगाव स्टेशन येथील स्मशानभूमी सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. अनेक वर्षांपासूनची असलेली ही स्मशानभूमी सध्या मोडकळीस आली असून, त्याचे असलेले लोखंडी खांब यांना गंज चढले असून, ते जीर्ण व स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. केडगाव स्टेशनची लोकसंख्या साधारण 11 हजारांपेक्षा अधिक आहे.

याठिकाणी अंत्यविधी करताना मोठी अडचण निर्माण होत आहे. नागरिकांनी या परिसरातील वाढते नागरिकीकरण लक्षता घेता याठिकाणी सुसज्ज अशी अद्ययावत स्मशानभूमी होणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या कालावधीत अंत्यविधी करताना मोठी अडचण निर्माण होत आहे. एवढ्या मोठ्या बाजारपेठेच्या गावाला अद्ययावत स्मशानभूमी असणे आवश्यक आहे.

याबाबत माहिती देताना केडगावचे सरपंच अजित शेलार म्हणाले, की केडगाव स्टेशन येथील स्मशानभूमी ही जुन्या काळातील आहे.
पुणे जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा कांचन कुल यांनी याची पाहणी केली आहे. कांचन कुल यांनी याबाबत आढावा घेतला असून, या स्मशानभूमीसाठी लवकरच निधीची तरतूद करून या ठिकाणी सुसज्ज व अद्ययावत अशी स्मशानभूमी करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच अजित शेलार यांनी दिली आहे.

Back to top button