पुढारी ऑनलाईन डेस्क : सुपरस्टार रजनीकांत (Superstar Rajinikanth) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनौमध्ये भेट घेतली आहे. भेटी दरम्यान त्यांनी त्यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद ही घेतले. यानंतर दोघांनी 'जेलर' चित्रपटही पाहिला.
सुपरस्टार रजनीकांत (Superstar Rajinikanth) शुक्रवारीच लखनौमध्ये आले होते. शनिवारी (दि. 19) त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्यांना भेटण्यासाठी ते त्यांच्या निवासस्थानी गेले होते. या भेटीत रजनीकांत भावूक झाले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना संत समजून त्यांच्या चरणांना स्पर्श केला. मात्र, मुख्यमंत्री त्यांना तसे करण्यापासून रोखले. रजनीकांत हे सीएम योगी यांच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. रजनीकांत 72 वर्षांचे आहेत तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 51 वर्षांचे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पायांना स्पर्श करण्यामागचे कारण म्हणजे ते संत असल्याचे ते मानतात.
दरम्यान, लखनौमध्ये 'जेलर'च्या स्पेशल स्क्रिनिंगला उपस्थित असलेले सुपरस्टार रजनीकांत (Superstar Rajinikanth) आज रविवार (दि.२०) अयोध्येला भेट देणार आहेत. यादरम्यान त्यांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या लखनौ येथील निवासस्थानी भेट घेतली.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मी 9 वर्षांपूर्वी अखिलेश यादव यांना मुंबईत एका कार्यक्रमात भेटलो होतो आणि तेव्हापासून आम्ही मित्र आहोत, आम्ही फोनवर बोलतो. 5 वर्षांपूर्वी जेव्हा मी इथे शूटसाठी आलो होतो पण मी त्याला भेटू शकलो नाही, आता तो इथे आला आहे म्हणून मी त्याला भेटलो, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
.हेही वाचलं का