Sunny Leone : सनीच्या केनेडी चित्रपटाची निवड सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये

सनी लिओनी
सनी लिओनी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सनी लिओनी दरवर्षी विविध भूमिका साकारत असते. (Sunny Leone ) जगभरात तिच्या कामाची चर्चा होत असताना ती तिचा आगामी चित्रपट केनेडी आता सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाऊन पोहोचला आहे. केनेडीमध्ये सनी चार्लीची भूमिका करत आहे जी भूमिका नक्कीच कमालीची आहे. (Sunny Leone )

या चित्रपटाची नुकतीच आदरणीय ज्युरींनी कान्स चित्रपट महोत्सवात मिडनाईट स्क्रीनिंगसाठी निवड केली होती. मध्यरात्रीच्या प्रदर्शनासाठी निवडलेला हा एकमेव भारतीय चित्रपट होता. या चित्रपटाने सात मिनिटांची स्टँडिंग ओव्हेशन देखील मिळवला. सनी लिओनीच्या चार्लीमध्ये केलेल्या भूमिकेचं कौतुक होतंय. कान्सपर्यंत मर्यादित न राहता हा चित्रपट सिडनी फिल्म फेस्टिवल मध्ये दाखवला जाणार आहे. सिडनी फिल्म फेस्टिव्हल १४ आणि १७ जून रोजी होणार आहे.

सिडनी फिल्म फेस्टिव्हलबद्दल अधिक बोलताना सनी सांगते, "कान्स फिल्म फेस्टिव्हल खूप यशस्वी ठरला आणि मी यासाठी खूप कृतज्ञ आहे. हा चित्रपट आता सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला जाणार आहे. अनुराग सर आणि संपूर्ण टीमचे आभार मानते की, यासारखा उत्तम चित्रपट मला करायला मिळाला.

केनेडीचे दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केले असून त्यात राहुल भट्ट सहकलाकार आहेत. केनेडीच्या सोबतीने सनीकडे अजून कमालीचे प्रोजेक्ट आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news