Amit Sadh : अमित साधच्या ‘मैं’ च शूटिंग पूर्ण ! BTS शेअर करत दिली न्यूज

amit sadh
amit sadh

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या महिन्यात सुरू झालेल्या 'मैं' चित्रपटाच्या ग्रिलिंग शेड्यूलनंतर अभिनेता अमित साधने (Amit Sadh) या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्याचं सांगितलं आहे. अमितने या चित्रपटातील काही अनसीन फोटो शेअर करत शूटिंग संपल्याची बातमी दिली आहे. "मैं" हे एक कॉप ड्रामा आहे, जो नक्कीच एक सामाजिक संदेश देऊन जाणारा चित्रपट ठरणार आहे. (Amit Sadh )

अमितने अलीकडेच त्याच्या सोशल मीडिया हँडलवर "मैं" च्या सेटवरील काही खास फोटो शेअर केले. सीमा बिस्वास, ईशा देओल, तिग्मांशु धुलिया आणि मिलिंद गुणाजी यांसारख्या प्रतिभावान कलाकारांसोबत अमित या चित्रपटात स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित चित्रपट निर्माते सचिन सराफ यांनी केले आहे.

" मैं " या चित्रपटाच्या रिलीज डेट लवकरच जाहीर केली जाणार असल्याचं देखील समजतंय. अमित येणाऱ्या काळात अनेक धमाकेदार प्रोजेक्ट्स करणार आहे. घुसपैठ, पुणे हायवे, दुरंगा २ आणि या सारखे अनेक उत्कृष्ट प्रोजेक्ट्समधून तो भेटीला येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news