Gadar 2 Teaser : तारा सिंह इज बॅक, 'गदर २' च्या टीझरने धुमाकूळ | पुढारी

Gadar 2 Teaser : तारा सिंह इज बॅक, 'गदर २' च्या टीझरने धुमाकूळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : तारा सिंह-सकीनाच्या रूपात सनी देओल आणि अमीषा पटेल यांनी मोठ्या पडद्यावर इतिहास रचला आहे. (Gadar 2 Teaser) इतक्या वर्षांनंतर ‘गदर’ (Gadar 2 Teaser) च्या आठवणी ताज्या होणार असून चित्रपटगृहात याचा दुसरा भाग पाहता येणार आहे. ‘गदर: एक प्रेम कथा’ बॉलीवूडचा पीरियड ॲक्शन चित्रपट आहे. पहिल्या भागात तारा सिंह (Sunny Deol) आणि सकीना (Ameesha Patel) ची अद्भुत प्रेमकहाणी दाखवण्यात आली होती. तिच कहाणीला २२ वर्षांनंतर पुन्हा एकदा पाहता येणार आहे. ११ आऑगस्टला थिएटर्समध्ये गदर २ चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे.

सोबतच शेवटी एक आवाज येतो- ‘दामाद है ये पाकिस्तान का, इसको नारियल दो, टीका लगाओ, वरना लाहौर ले जाएगा.’

टीजरचा धुमाकूळ

‘गदर २’ चा टीजर (Gadar 2 Teaser) इमोशन आणि ॲक्शनने भरपूर आहे. यामध्ये काही सीन्स दाखवण्यात आले आहेत, जे दमदार आहेत. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी टीझर शेअर केला आहे.

थिएटरमध्ये टाळ्य़ांचा कडकडाट

‘गदर’ दिल्ली, जयपूर आणि मुंबईमध्ये रिलीज करण्यात आलाय. चित्रपटाचे शोज हाउसफुल्ल होत आहेत. थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट ऐकू आला. सनी देओल-अमीषा पटेलची जादू पुन्हा एकदा पडद्यावर चालली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

Back to top button