meenakshi rathod : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम देवकीच्या घरी नन्ही परीचं आगमन

meenakshi rathod
meenakshi rathod

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील देवकी म्हणजेच अभिनेत्री मीनाक्षी प्रेग्नेंसीच्या (meenakshi rathod) काळातही सगळ्यांची लाडकी देवकी म्हणजे अभिनेत्री मीनाक्षी राठोड (meenakshi rathod) हिने नऊ महिने मालिकेचे चित्रीकरण केले होते. ती पहिल्यापासूनचं ॲक्टिव्ह आहे. तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास कौतुकास्पद आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत तिने देवकी ही भूमिका साकारलीय. तिच्या घरी एका नन्ही परीचे आगमन झाले आहे. ती प्रेग्नेंट असतानाही तिने सेटवर काम केलं होतं. काही दिवसांपूर्वी तिचे बेबी बंपसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही फोटोंमध्ये तिच्यासोबत तिचा पतीदेखील या फोटोंमध्ये दिसतो. या गोड बातमीनंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.

मिनाक्षीचा पती कैलास वाघमारेने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने बाळाच्या पायांचे ठसे असलेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने कॅप्शन दिलीय-माय गोडगोजिरी होऊन परत आली.

देवकी मुळची जालन्याची आहे. तिला बालपणापासून अभिनयाची आवड आहे. तिच्या अभिनयाची सुरूवात शाळेपासून झाली. तिच्या वडिलांनाही अभिनयाची आवड आहे. त्यामुळे त्यांनी देवकीला अभिनय, नृत्य, नाटक स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहन दिले. तिला तिच्या घरातील मिनू म्हणून बोलावतात. तिचा वाढदिवस १७ मार्चला असतो. गंगाराम वाडी, अंबड जालना येथे तिचा जन्म झाला.

जालन्यातील गंगाराम वाडी, अंबड येथील शाळेतून तिने शिक्षण घेतले. करिअर करण्यासाठी ती मुंबईला आली. थिएटर आर्ट्स, मुंबई विद्यापीठ येथून तिने पुढील शिक्षण घेतले. तिला 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकात सावित्रीबाई यांची भूमिका मिळाली. तिने मयत, कमरबंद, सायकल यासारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

तिने २०१८ मध्ये मराठी मालिका बाळूमामाच्या नावानं चांगभलं मधून टीव्ही विश्वात पदार्पण केले. २०२० मध्ये सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका मिळाली. यामध्ये तिची देवकी उदय शिर्के पाटील ही व्यक्तीरेखा आहे.

राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी

तिने अनेक लघुपटांमध्ये काम केलंय. तिचा 'खिसा' लघुपट गाजला. खिसाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

पती आहे अभिनेता

देवकीचा पती कैलाश वाघमारे हादेखील एक अभिनेता आहे. दोघेही कॉलेजमध्ये असताना अभिनय करत होते. तेथूनचं दोघांच्या प्रवासाला सुरुवात झाली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news