जळगाव : प्रतिनिधी : शिरसोली येथील ३३ वर्षीय तरूणाने राहत्या घरात मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केलीय. आज २८ जानेवारी रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गिरीष पाटील हा आई वडील, पत्नी आणि भाऊ यांच्यासह शिरसोली येथे वास्तव्याला आहे. गेल्या १३ वर्षांपासून तो बांभोरी येथील जैन कंपनीत कामाला आहे. गुरूवारी २७ जानेवारी रोजी रात्री त्याने कुटुंबियासह जेवण करुन तो झोपी गेला. मध्यरात्री सर्वजण झोपलेले असतांना मागच्या खोलीत गिरीष प्रकाश पाटील (वय-३३) याने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.
त्यांची पत्नी रेणूका या शुक्रवारी २८ जानेवारी रोजी सकाळी ५.३० वाजता झोपेतून उठल्या. त्यावेळी हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. यावेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला होता. नातेवाईकांनी तातडीने त्यांना खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई सुनंदाबाई, वडील प्रकाश पाटील, भाऊ सतिष आणि पत्नी रेणूका असा परिवार आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.