नौदलाला मोठं यश! ‘ब्रह्मोस’नं अचूक लक्ष्य भेदलं, पहा व्हिडिओ

नौदलाला मोठं यश! ‘ब्रह्मोस’नं अचूक लक्ष्य भेदलं, पहा व्हिडिओ

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

भारतीय नौदलाने मंगळवारी आणखी एक महत्त्वाची कामगिरी केली. गायडेड क्षेपणास्त्र विनाशक आयएनएस दिल्ली (INS Delhi) या युद्धनौकेवरुन ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची (BrahMos supersonic cruise missile) यशस्वी चाचणी घेतली. या चाचणीसाठी INS दिल्लीच्या बोर्डवर अपग्रेड केलेल्या मॉड्यूलर लाँचरचा वापर करण्यात आला. हे क्षेपणास्त्र डागल्यानंतर त्याने अचूक लक्ष्य भेदले, असे नौदलाकडून सांगण्यात आले आहे.

भारतीय नौदलाने ट्विट करत याची माहिती दिली आहे. "BrahMosची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ब्रह्मोसनं पुन्हा एकदा लांब पल्ल्याचे लक्ष्य भेदण्याची क्षमता दाखवून दिली." असे नौदलाने क्षेपणास्त्र चाचणीचा व्हिडिओ ट्विट करत म्हटले आहे.

विशेष म्हणजे वारहेडशिवाय या क्षेपणास्त्राने लक्ष्यभेद करत वापरात नसलेल्या एका जहाजाला एक मोठे भगदाड पाडले. यामुळे ब्रह्मोसच्या माऱ्यामुळे वापरात नसलेले जहाज बुडाले. महत्वाची बाब म्हणजे ब्रह्मोसने एकाच लक्ष्यावर दोन थेट प्रहार केले.

या क्षेपणास्त्राचा सुमारे ३ हजार किमी प्रतितास वेग आहे. तसेच हे क्षेपणास्त्र हवाई संरक्षण प्रणालीद्वारे रोखणे कठीण असल्याचे संरक्षण दलातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news