सांगली : उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

सांगली : उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

जत, पुढारी वृत्तसेवा : जत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांना नुकतेच पोलीस महासंचालक पदक जाहीर केले आहे. हे पदक पोलिस दलात गुणवत्तापूर्वक सेवा करणाऱ्या आणि विशेष कार्य केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात येते. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पोलीस महासंचालक पदक देण्यात येणार आहे . रत्नाकर नवले यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन केले जात आहे.

डीवायएसपी नवले यांनी मालेगाव, नाशिक येथे आपल्या कामातून ओळख बनवली आहे. तर सद्या त्‍यांची जत पोलीस उपविभागीय कार्यालय येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी तालुक्यातील अनेक प्रलंबित असणाऱ्या तपासाचा निपटारा, अनेक गुन्ह्यांची उकल तत्परतेने करून आपला ठसा आणि ओळख बनवली आहे.

कोरोना काळात त्‍यांनी चांगल्या पद्धतीचे काम केले आहे. या सर्व कामाची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाने पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात केले आहे. त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जत, उमदी, कवठेमंहकाळ या पोलिस ठाण्यातील कामकाजात सुसूत्रता आणली आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून हजर झालेले राजेश रामाघरे यांचाही पोलीस महासंचालक पदकाने सन्मान व गौरव होणार आहे.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news