पुढारी ऑनलाईन: तुर्की सीरियातील विनाशकारी भूकंपात आत्तापर्यंत ४१ हजारांहून अधिक जणांनी आपला जीव गमावला आहे. या नैसर्गिक आपत्तीनंतर अनेक लोकांचा या शक्तीशाली भूकंपात मृत्यू झाला. पण भूकंपानंतर वाचलेल्यांचा संघर्ष हा अजूनही सुरूच आहे. भूकंपातून वाचल्यानंतर अन्न-पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
शक्तीशाली भूकंपानंतर ४१ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला. परंतु हजारो लोकांना वाचवण्यात यश आले आहे. भूकंपातून वाचले काही लोक गंभीर जखमी झालेत, शेकडो नागरिक बेघर झाले आहेत तर अनेकांची उपासमार सुरू आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या या लोकांना आता स्वतः जिवंत राहण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. कडाक्याच्या थंडीबरोबरच या लोकांना खाण्यापिण्याच्या अभावाचाही सामना करावा लागत असल्याचे वृत्त बीबीसी या वृत्तवाहिनीने दिले आहे.
भूकंपातून वाचलेल्या आणि बेघर झालेल्यांना आता प्रचंड बर्फवृष्टीचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे मदतकार्यात देखील अडथळे येत आहेत. निसर्गाच्या प्रकोपानंतर बचावलेल्या हजारो नागरिकांना आता कडाक्याची थंडी, अन्न, पाणी, निवारा आणि आर्थिक गोष्टींसाठी मरणयातना भोगाव्या लागत आहेत.
भूकंपग्रस्त भागत बचावकार्य वेगाने सुरू आहे. जखमींना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. भूकंपाचा सर्वाधिक फटका बसलेल्या 'हाताय' प्रांतातील नागरिकांची घरे पूर्णपणे उद्धवस्त झाली आहेत. येथील लोक थंडी, भूक आणि निराशेशी झुंज देत आहेत. पुरेसे तंबू आणि निवारा नसल्याने भूकंपातून वाचलेले लोक शून्य अंश डिग्री तापमानात रस्त्यावरच राहात आहेत. काहीजण उद्धवस्त घरे, सुपरमार्केट, कारपार्क, मशिदी, रस्त्याच्या कडेला कोसळलेल्या इमारतींच्या अवशेषांखालीच आसरा घेत आहेत.
82 देशांतील 9,046 परदेशी कर्मचारी सध्या आपत्ती क्षेत्रात काम करत आहेत, असे तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय बचाव पथके भूकंपग्रस्त तुर्कीमध्ये भूकंपग्रस्तांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा करत आहेत.
हे ही वाचा :