Stock Market Opening : शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने गुरुवार (दि.१६) तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ३८० अंकांहून अधिक वाढून ६१,६०० वर पोहोचला. तर निफ्टी सुमारे १०० अंकांच्या वाढीसह १८,१०० वर गेला.
अदानी पॉवर (४.९७ टक्के), येस बँक (०.३० टक्के), टाटा स्टील (०.६३ टक्के), ऑईल अँड नॅचरल गॅस (२.२७ टक्के), पंजाब नॅशनल बँक (०.४९ टक्के), अदानी ग्रीन एनर्जी (४.२७ टक्के), अंबुजा सिमेंट (१.६७ टक्के) हे शेअर्स वाढले आहेत. तर अदानी टोटल गॅस (-३.४५ टक्के), व्होडाफोन आयडिया (-१.९४ टक्के) या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. (Stock Market Opening)
NSE वर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) ४३२.१५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) ५१६.६४ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. या महिन्यात १५ फेब्रुवारीपर्यंत FII ने २,३५४.३७ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली तर DII ने ७,६९६.१७ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. जानेवारी महिन्यात, FII ने ४१,४६४.७३ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली तर DII ने ३३,४११.८५ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.
हे ही वाचा :